
वसई(प्रतिनिधी)- काही दिवसा पासून सोशल मीडिया व प्रसार माध्यम द्वारे बातमी येत आहे की , ” विवा कॉलेज च्या एका प्रिन्सिपलचा हिजाब मुळे राजीनामा? ” पण हे प्रकरण खोटे आहे, आपले मा. आमदार ( श्री. हितेंदजी ठाकूर) यांनी वसईत कधीही हिंदू -मुस्लिम असे वाद केला नाही? आज पर्यंत वसईत कधीही कोणत्याही धर्माबद्दल द्वेष निर्माण करू दिले नाही ? आज माझ्या 25 वर्षाच्या कार्य काळात मी बघत आलो की मा. आमदार साहेबांनी असे धार्मिक बाबतीत सर्व धर्माना जातींना त्यांनी सहकार्य केले आहे, कोणत्याही पक्षातील कार्यकर्तेला त्यांनी वेळोवेळी सहकार्य केले आहे, आणि अशा वसई आमदारांना अशा पद्धतीने बदनाम करण्याचा अधिकार कोणालाही नाही आहे, काही समाज कंटक लोक समाजात असे प्रकरण पसरवून वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. हिजाब बाबत अजून वसईत अशी कोणतीही प्रकरण समोर आले नाही आहे. हे फक्त वसई आमदार साहेबांना बदनाम करण्याचा कट विरोधी लोक करत आहेत. म्हणून मुस्लिम समाजातील सर्व बांधवांनी यावर लक्ष देऊ नये असे आश्वासन फिरोज खान यांनी केले आहे. वसई आमदार हे बहुजन विकास आघाडी पक्षाचे अध्यक्ष असून त्यांच्या पक्षात मुस्लिम कितीतरी महिला बुरखेधारी आहेत. त्यांना कधीही बुरखा परिधान संदर्भात कधी काही असे आम्ही ऐकले नाही मला असे वाटत आज की वसई आमदार यांना बदनाम करण्याचा प्रयत्न म्हणजे आता नवीन मुद्दा ” हिजाब ” प्रकरण ? विवा कॉलेज मध्ये मुस्लिम समाजातील शिक्षक कितीतरी आहेत. पण कधीही कोणत्याही धर्मातील शिक्षकने तक्रार केली नाही हा प्रकरण वसई आमदार ( हितेंद्रजी ठाकूर) यांना बदनाम करण्याचा प्रयत्न काही वसईतील लोक करत आहे. पण माझ्या मते आमचा खीदमतुल मुसलेमीन एज्युकेशन अँड वेल्फेअर ट्रस्टचे पूर्ण पाठींबा वसई आमदार ( हितेंद्रजी ठाकूर ) यांना आहे व राहील ? असे खिदमतुल मुसलेमीन ट्रस्टचे अध्यक्ष मा. फिरोज खान यांनी सांगितले आहे.