दलित पँथर यानंतर राष्ट्रीय पँथर आघाडी नावाने राज्यभरात काम करेल

प्रतिनिधी : दलित पँथरचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष अविश राऊत यांनी आज आपल्या जिल्ह्यातील सर्व समर्थकांच्या व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत दलित पॅंथर संघटनेचे राष्ट्रीय पँथर आघाडीमध्ये विलीन केले. राज्यात दलित शब्दाला होत असलेला विरोध तसेच दलित पँथर संघटनेचे पाच तुकड्यात झालेले विभाजन मनाला वेदना देणारे आहे. एकाच राज्यात पाच केंद्रीय अध्यक्ष पाच महाराष्ट्र अध्यक्ष यामुळे कार्यकर्त्यांना जिल्ह्यात , राज्यात काम करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. शिवाय जव्हार येथील दोन प्रकरणांमध्ये वरिष्ठांचे सरळ हस्तक्षेप संघटनेच्या कार्यकर्त्यांचे खच्चीकरण करण्यासारखे असून मनोबल तोडणारे आहे. याबाबत वारंवार पक्षश्रेष्ठींना व राष्ट्रीयध्यक्षांकडे नाराजी व्यक्त करूनही कारवाई होत नसल्याने आज दलित पँथर संघटनेतून कार्यकर्त्यांसह बाहेर पडत असून , दलित पँथरचे महाराष्ट्रातील सर्व समर्थक व कार्यकर्त्यांसह राष्ट्रीय पँथर आघाडी मध्ये विलीनीकरण करत आहोत तसेच संघटनेचा प्रथम कार्यकर्ता मेळावा 1 मे 2022 रोजी पालघर जिल्ह्यात घेण्यात येईल असे एकमताने ठराव तसेच अनेक महत्वपूर्ण विषयांवर एकमताने निर्णय सदरच्या सभेत घेण्यात आले व लवकरच कार्यकर्ता मेळावा घेऊन संपूर्ण पालघर जिल्ह्यात तसेच महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात नव्याने कार्यकारणी दिली जाईल तो प्रयंत जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी आपल्याकडे असलेल्या त्याच पदांवर राष्ट्रीय पँथर्स आघाडीमध्ये काम करावे असे राष्ट्रीय पँथर आघाडीचे संस्थापक अध्यक्ष अविश राऊत तसेच वरिष्ठ पदाधिकारी यांनी आपल्या सर्व जिल्हा कार्यकारणी व कार्यकर्त्यांसह जाहीर केले. यावेळी आघाडीचे संस्थापक अध्यक्ष अविश राऊत , पालघर जिल्हाध्यक्ष जगदीश राऊत , पालघर जिल्हा कार्याध्यक्ष अरशद खान , पालघर जिल्हा लोकसभा अध्यक्ष बिंबेश जाधव , पालघर जिल्हा संघटक लहानू डोबा , पालघर जिल्हा महासचिव व जिल्हा प्रसिद्धी प्रमुख संतोष कांबळे , पालघर जिल्हा उपाध्यक्ष रोहित चौधरी , पालघर जिल्हा कोषाध्यक्ष भरत महाले , पालघर जिल्हा प्रमुख सल्लागार सिद्धार्थ जाधव , सदाशिव गारे ,पालघर जिल्हा सचिव व प्रसिद्धीप्रमुख शिवप्रसाद कांबळे , पालघर जिल्हा सहसचिव रमाकांत गायकवाड, पालघर जिल्हा महिलाध्यक्षा मोहीणी जाधव , पालघर जिल्हा महिला उपाध्यक्ष विद्या मोरे , स्नेहा जाधव , रोशन शेख , डहाणू तालुका अध्यक्ष तथा डहाणू व तलासरी तालुका संपर्कप्रमुख विनायक जाधव , पालघर तालुका अध्यक्ष किशोर राऊत, वसई तालुका अध्यक्ष हरेश मोहिते, जव्हार तालुका सहसंपर्कप्रमुख इरफान शेख , जव्हार तालुका अध्यक्ष देविदास दीघा , मोखाडा तालुका अध्यक्ष ईश्वर धोंडगा , पालघर जिल्हा युवा उपाध्यक्ष हितेश कुर्ले , जिल्हा कार्यकारणी विशाल मोहने , मोखाडा तालुका प्रमुख सल्लागार कमलाकर माळी, डहाणू तालुका महासचिव प्रसन्ना जाधव , पालघर तालुका उपाध्यक्ष अफसर खान ,अहमद खान , अली हसन, पालघर तालुका सहसचिव योगेश राऊत , सय्यद फिरोज नवाब , पालघर तालुका महिला उपकार्याध्यक्षा शालिनी वानखेडे , अर्चना वैद्य , वाणगाव शहर उपाध्यक्ष गिरीधारी बिसवाल , वाणगाव गोवणे विभाग प्रमुख सुदाम दामले , डहाणू नरपड विभाग प्रमुख अजय पडवले , सातपाटी विभाग अध्यक्ष प्रवीण पाटील , बोईसर शहर अध्यक्ष सिद्धार्थ वाघमारे व जिल्ह्यातील असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *