नवी मुंबई दि. 31 – कोकण विभागीय माहिती कार्यालयातील गेल्या 35 वर्षापासून यशस्वीपणे सेवा देणारे वरिष्ठ लिपिक श्री. राजेंद्र भार्गव मोहिते हे आज दि. 31 मार्च 2022 गुरुवार रोजी सेवानिवृत्त झाले. त्यांच्या सेवापूर्ती निमित्त विभागीय माहिती कार्यालयात छोटेखानी सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. त्यांना विभागीय माहिती कार्यालयातील, कर्मचारी आणि कोकण विभागातील पत्रकारांनी स्नेह, प्रेमपूर्वक निरोप देऊन पुढील भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
कोकण विभागीय माहिती उपसंचालक डॉ.गणेश मुळे यांच्या हस्ते सेवानिवृत्त वरिष्ठ लिपिक श्री. राजेंद्र मोहिते यांचा यथोचित सत्कार आणि गौरव करून त्यांना भेटवस्तू देण्यात आल्या. प्रमुख पाहुणे म्हणून अशोक पाटील, डी.बी.पाटील आणि राजेंद्र शिरसाठ यांची उपस्थिती होती. याप्रसंगी कोकण भवनचे वैद्यकीय अधिकारी डॉ.गणेश धुमाळ, नवीमुंबई प्रेस क्लबचे अध्यक्ष मनोज जालनावाला, दै.वादळवाराचे संपादक तथा क्रियाशिल प्रेस क्लबचे संस्थापक विजय कडू, श्री.मोहिते यांच्या पत्नी सौ. ऋता मोहिते, कन्या नेहा साळवी आणि जावई सिध्देश साळवी तसेच परिवारातील इतर सदस्य, कोकण भवनातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी श्री. मोहिते म्हाणाले की, 21 फेब्रूवारी 1986 रोजी विभागीय माहिती कार्यालयाच्या सेवाकार्यात पाऊल ठेवले एकंदरीत माझ्या संपूर्ण सेवाकार्यकाळात मला माझ्या सर्व अधिकारी, कर्मचारी, पदाधिकारी व पत्रकार तसेच लोकप्रतिनिधी यांचे कडून मिळालेल्या सहकार्यामुळे माहिती खात्याला चांगल्या प्रकारे सेवा देण्याचा प्रयत्न केला आहे. सेवानिवृत्त होत असताना मी माझ्या सेवाकाळात लाभलेल्या सर्व सहकाऱ्यांचे आभार व्यक्त करतो, प्रत्येक कार्यात आपण सर्वांनी दिलेले प्रोत्साहन मार्गदर्शन व अनमोल अशी केलेली मदत या बद्दल मी आपला सर्वांचा ऋणी राहील आपण माझ्या पुढील आयुष्यासाठी ज्या सुयश शुभेच्छा दिल्या. त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो.
याप्रसंगी उपस्थित मान्यवर, मित्रवर्ग, सहकारी अधिकारी /कर्मचारी तसेच कुटुंबातील सदस्यांनी श्री. मोहिते यांच्याबद्दल आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माहिती सहायक प्रविण डोंगरदिवे यांनी आणि सुत्रसंचालन प्रतिक्षा कांबळे यांनी केले.
श्री. राजेंद्र मोहिते यांना सेवानिवृत्ती निमित्त कोकण विभागातील सर्वस्तरातून शुभेच्छा देण्यात आल्या .
000000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *