
उच्च स्तरीय चौकशी करून कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी शिस्तभंगाची कारवाई करा !

प्रतिनिधी : पालघर जिल्हा अंतर्गत वसई तालुक्यातील माणिकपूर मंडळ अधिकारी, गोखिवरे तलाठी हद्दीत गाव मौजे राजावली येथे अवैध माती भराव व अनधिकृत बांधकामांप्रकरणी वसई तहसीलदार कार्यालयाकडून कोणतीही कारवाई झालेली नाही. तहसील कार्यालयाने नोटीस बजावली असून कन्सेप्चूअल एडवायजरी सर्विसेसने नोटीसला उत्तरच दिलेले नाही. कारवाई न करण्याचे एकमेव कारण म्हणजे या प्रकरणात मोठा भ्रष्टाचार झालेला आहे. सदर बाबत दाखल तक्रारी संदर्भात कोणतीही कारवाई केलेली नाही. कारवाई न करण्याचे एकमेव कारण म्हणजे लाचखोरी. सदर प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर शिस्तभंगाची कारवाई करावी.
याबाबत अधिक माहिती अशी की,पालघर जिल्हा अंतर्गत वसई तालुक्यातील माणिकपूर मंडळ अधिकारी, गोखिवरे तलाठी हद्दीत गाव मौजे राजावली सर्वे नंबर ८७/५ अ, ८७/५ ब, १८५/९ या भूखंडावर बेकायदेशीर उत्खनन करून सर्वे नंबर ९१, ९२, ९३, ९५, ९६, ९८, ४५/१, ४५/३, ५७, ५८/४, ५८/५, ६२, ६४, ६३/५, ६६, ५४, ५५, ५६, १७, १८, १९, २०, १४, ३२ या भूखंडावर अनधिकृत दगडमातीचा भराव केल्याप्रकरणी दि. २३/८/२०२१ रोजी तहसील कार्यालयाकडून नोटीस बजावण्यात आली होती. सदर प्रकरणी दि. ३१/८/२०२१ रोजी सुनावणी ठेवण्यात आली होती. मात्र सदर प्रकरणी पुढे कोणतीही कारवाई झालेली नाही. कारवाई का झाली नाही याची चौकशी करून दोषींवर शिस्तभंगाची कारवाई करावी.
अवैध माती भराव केलेल्या सदर भूखंडावर अनधिकृत बांधकामे उभी राहिलेली आहेत. सदरच्या अनधिकृत बांधकामांवर निष्कासनाची कारवाई करून बांधकामे करणाऱ्यांवर एमआरटीपी कायद्याने गुन्हे दाखल करावेत.
सदर प्रकरणी कोणतीही कारवाई न करून वसई तहसीलदार कार्यालयाने भ्रष्टाचाराला खतपाणी घातले आहे. बेकायदेशीर उत्खनन व अवैध भरणी करणारे भूमाफिया म्हणतात की, आम्ही अधिकाऱ्यांना मैनेज केले आहे. कितीचा आर्थिक व्यवहार झाला आहे, हे चौकशीत उघड होईल. सदर प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे. भ्रष्ट अधिकारी गैरधंद्याना संरक्षण देत राहतील तर ते स्वतः एक दिवस अडकतील.