
शिवाजी कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय कन्नड आणि आयकाँनस अंड स्कल्पच्यरस अँड रिसर्च फाउंडेशन, औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय राष्ट्रीय परिषद एसकल्चर स्कलपचर आर्ट अँड आर्किटेक्चर या विषयावर 25 आणि 26 मार्च 2022 आयोजित करण्यात आलेली होती. सदरील सहआयोजक महाविद्यालय डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद यांच्याशी संलग्नित आहे. डॉ. संजय पाईकराव हे आयकॉन्स स्कलपलचर रिसर्च फाउंडेशन औरंगाबाद या संस्थेचे सचिव आहेत .यांच्या मार्गदर्शना अंतर्गत पितळखोरा लेणी येथे 26 मार्च 2022 रोजी परिषदेला आलेल्या लोकांची भेट आयोजित करण्यात आली होती. या परिषदेत करता महाराष्ट्रातील औरंगाबाद, नागपूर, सोलापूर, बीड, नांदेड, मुंबई, कल्याण गोवा, धारवाड व कर्नाटक आदी शहरातून अभ्यासक सहभागी झाले होते. पितळखोरा लेणी येथे संबंधित स्थळावर आग्या मोहोळ मधमाशांचे असंख्य पोळे आहेत हे माहीत असतानाही अशा मधमाशांच्या पोळ्याच्याजवळ चाळीस-पन्नास अभ्यासकांना घेऊन आयोजकांनी माहिती देणे सुरू केले जवळच मधमाशांचे पोळे आहे असे आयोजकांनी सांगितले त्याची व्हिडिओ चित्रफित सामाजिक माध्यमावर उपलब्ध आहे. अचानक झालेल्या गोंगाटामुळे असंख्य मधमाश्यांनी परिषदे करता आलेल्या राज्यभरातील विविध अभ्यासकावर हल्ला केला. या हल्ल्यात 50 पेक्षा जास्त अभ्यास जखमी झाले. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे अभ्यासकांची तारांबळ उडाली ते जीव वाचवण्यासाठी सैरावैरा धावू लागले प्राप्त माहितीनुसार सदर ठिकाणी चपलांचा बुटांचा ढीग पडला काहींचे मोबाईल हरवले काहीचे मोबाईल गायब झाले असे कळते काही अभ्यासकांनी येथील कुंडात उड्या टाकल्या. सदर कुंडात अनेक लोक दगावल्याची माहिती ज्ञात आहे याप्रसंगी आयोजकांच्या मार्फत कोणत्याही पद्धतीची मदत तात्काळ अभ्यासकांना होऊ शकली नाही त्यामुळे आयोजक मूर्ती व शिल्प संशोधन परिषदेचे सचिव संजय पाईकराव यांच्यावर नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. स्थानिक लोकांनी आणि स्थानिक आ.मा उदयसिंग राजपूत यांना या घटनेची माहिती प्राप्त होता त्यांनी तसेच पत्रकार राजानंद सुरडकर, बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ.प्रतिभाताई अहिरे यांनी स्वतःहून मदत कार्य देण्याकरता पुढाकार घेतला व अभ्यासक यांना शासकीय रुग्णालयात उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी घाटी व इतरत्र हलविण्यास मदत केल्याची माहिती प्राप्त झाली आहे. ग्रामीण रुग्णालय अधीक्षक डाँ. परदेशी व राजश्री शाहू प्रतिष्ठान चे अध्यक्ष डॉ. सिताराम जाधव डॉ.मुकुंद सोमवंशी डॉ.सदाशिव पाटील, सचिन गिरिराज ठाकूर ,डॉ. प्रवीण पवार, डॉ .प्रकाश खेत्री आदींनी घटनास्थळी मदत करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली.
या लेणीत आग्यामोहोळचे अनेक पोळे आहेत हे आयोजकांना माहित असूनही मधमाशांच्या पोळ्याच्या जवळ माहिती देणे टाळता आले असते परंतु असे न केल्यामुळे मधमाशांनी चढवलेला हल्ल्यात पुढील अनेक अभ्यासक जखमी झाले. संजय पाईकराव, संदेश कांबळे, सुधा चंद्र जैन, सलीम खान, शैलेश सावे, अतुल भोसेकर ,संजय हवालदार, अस्मिता हवालदार रा. मध्य प्रदेश जगदीश गोपाल असुदे ,माधुरी जगदीश असुदे रा.कर्नाटक ,नीता नाईक हे गंभीर जखमी झाले आहेत तसेच प्रा. धम्मपाल माशाळकर त्यांच्या पत्नी माया माशाळकर त्याचा लहान मुल रा. सोलापूर , प्रा अरविंद आचार्य राहणार हैदराबाद, संजीवनी मांदळे रा.औरंगाबाद, रिजवान देशमुख, वसुधा देशमुख रा.कल्याण, थोरवत श्रीहरी रा. नाशिक, सुरज रतन जगताप मुंबई, रितेश वाघे, अक्षर कापसे, पृथ्वीराज धवड सर्व रा.नागपूर प्रा.माधुरी चौगुले रा.धारवाड, पुरातत्त्व विभागाचे रक्षक देविदास राठोड राहणार आंबा तांडा, डॉ.किरण प्रकाश काळे रा. सोलापूर, नीता ओमप्रकाश नायक रा.गोवा, वसुधा देशमुख रा.डोंबिवली ,डॉ. विजयकुमार भांजे राहणार उस्मानाबाद ,डॉ.आनिता शिंदे राहणार बीड, हर्ष विजय जावळे ,डॉ. प्रकाश महाजन, अमोल कांबळे रा।.सोलापूर बालाजी शिरसाट रा.सोलापूर, प्रा. जगदीश भेलोंडे, प्रा. कारभारी भानुसे, अरुण थोरात रा. कळंकी, स्वप्नील मगरे ,सचिन खरात, सागर गायकवाड आदींचा याप्रसंगी झालेल्या मधमाशांच्या हल्ल्यामध्ये जखमी मध्ये समावेश आहे .शैलेश सावे हे तब्बल तीन तास मदत कार्य प्राप्त न झाल्यामुळे ते अत्यवस्थ अवस्थेत दरीत पडून होते. स्थानिकांच्या मदतीने त्यांना दरीतून काढण्यात आले त्यादरम्यान हजारो मधमाशांनी अभ्यासकांना चावा घेतला सावे यांच्या अंगावर कपडे टाकून शेवटी स्थानिक आदिवासींची मदत घेण्यात आली यशो धावजी आघान राहणार ठाकरवाडी, सोमनाथ रघुनाथ उघडी राहणार अंबाला, हरिदास गावंडे,येशु वाघान,साईनाथ काळे यांनी तेव्हा टेंभा पेटवून रेस्क्यू करून जखमींना दरीतून वर आणले असे जरी असले तरी मधमाशांनी शेवटपर्यंत अभ्यासकांचा पिच्छा सोडला नाही . डॉ.सिताराम जाधव यांनी सावे यांच्यावर घटनास्थळी उपचार केल्यामुळे त्यांच्या जीविताचा धोका कळला. या हल्ल्यात एकंदर 40 जण जखमी आणि दहा जण गंभीर असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
मूर्तिशिल्प व संशोधन परिषदेच्या संजय पाईकराव यांच्या ढिसाळ नियोजनामुळे आणि नियोजन शून्य कारभारामुळे सदर ठिकाणी आग्या मोहोळ आहे हे माहित असताना देखील आशा धोकेदायक ठिकाणी अभ्यासकांना नेऊन त्यांचा जीव धोक्यात घालण्यात आल्यामुळे औरंगाबाद परिसरात नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.व या पुढे अशा कार्यक्रम सहभागी होणार नसल्याचे व बाहेर अभ्यासकाना अशा धोकेदायक ठिकाणी नेण्याची गरज काय होती असे अभ्यासक यांनी बोलून दाखवले व तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. या प्रसंगी उपस्थित असलेले मुख्य आयोजक संजय पाईकराव यांच्यावर ढिसाळ नियोजना मुळे फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी रिपाई नेते गिरीश दिवाणजी यांनी महाराष्ट्रचे मुख्यमंत्री,राज्यपाल,उच्च व तंत्र शिक्षणमंत्री, पोलीस महासंचालक व औरंगाबादचे पोलीस अधिक्षक यांच्या कडे मागणी केली आहे.



