दिनांक ६/४/२०२२ रोजी पालघर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष वैदेही वाढाण यांनी वसई तालुक्यातील रानगाव ग्राम पंचायतीस भेट देऊन तिथल्या समस्या जाणून घेतल्या.रानगाव ग्रामस्थांच्या अनेक तक्रारीनुसार रानगाव ग्राम पंचायतीला भेट देण्याचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी रानबाग रस्ता मोरेश्वर विठ्ठल घरत यांचे जुने घर ते ट्रान्सफार्मर या रस्त्याचे डांबरीकरण तर ट्रान्सफार्मर ते गोविंदवाडी या रस्त्याचे खडीकरण करण्यासाठी आपण प्रयत्न करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी अध्यक्ष वैदेही वाढाण यांना केली, यावर आपण नक्कीच प्रयत्न करू असे वैदेही वाढण यांनी सांगितले.
तसेच ग्रामस्थांनी अनेक दिवसापासून रानगाव ग्राम पंचायती मधल्या रस्ते, सुरक्षा भिंत, यात भ्रष्टाचार झाला असल्याची तक्रार जिल्हा परिषद अध्यक्ष वैदेही वाढाण यांच्याकडे केली होती, त्यानुसार प्रत्यक्ष पाहणी करून जो गैरव्यवहार झाला असेल त्या संदर्भात चौकशी लावून कारवाई करण्यात येईल असे आश्वासनहि यावेळी अध्यक्ष वैदेही वाढाण यांनी दिले.तसेच ग्राम पंचयत मध्ये बैठक घेऊन सरपंच उपसरपंच व ग्रामस्थ यांच्या सोबत गावातील विकास कामांबाबत चर्चा केली.

पंचशील नगर मध्ये भेट देऊन दलित वस्तीच्या समाज मंदिराला जागा नसल्याबाबत जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी येथील महिला व ग्रामस्थांनी केली तसेच शौचालय, पाणी, बंद पडलेला सौर उर्जा प्रकल्प यांची पाहणी करून सदर प्रश्न पाठपुरावा करून सोडवण्यात येतील अशी ग्वाही यावेळी अध्यक्ष वैदेही वाढाण यांनी दिली.

या पाहणी दरम्यान सहायक गट विकास अधिकारी, प्रदीप डोलारे, उपअभियंता शिंदे, उपतालुका प्रमुख अँड.आनंद घरत, विभाग प्रमुख प्रथमेश बावकर, सामाजिक कार्यकर्ते दिपक घरत, शाखा प्रमुख जलेंद्र गोवारी, संतोष वैती, कमलाकर गोवारी, अनंत गोवारी, उपसरपंच श्रीरंग मेहेर, प्रताप घरत, ग्रामपंचायत सदस्य, मच्छिमार संस्थाचे चेअरमन ममता वैती, दिपक मेहेर, भरत पवार, जगदीश घरत, अभय घरत, पंकज घरत उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *