

अनेक निर्णयात्मक धोरणांवर आगामी काळात एकत्रित काम करण्याचे संकेत
मुबई- राष्ट्रीय पँथर्स आघाडीचे सर्वेसर्वे अविश राऊत आणि कार्यकर्ते यांनी आज मुबई येथील काँग्रेसच्या टिळक भवन कार्यालयात काँग्रेस मा. प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले साहेब यांची भेट घेऊन अनेक निर्णयात्मक धोरणांवर आगामी काळात एकत्र येऊन काम करण्याबाबतची महत्वाची बैठक संपन्न झाली .यावेळी लवकरच पालघर जिल्ह्यात नानाभाऊ पटोले साहेबांचे आगमन होणार असून , जिल्ह्यातील मच्छिमार बांधवांचे प्रश्न , कामगारांचे व कष्टकरी जनतेचे प्रश्न , शेतकऱ्यांचे प्रश्न , प्रदूषण , कुपोषण , आदिवासी बांधवांचे प्रश्न , सार्वजनिक बांधकाम विभागातील व विविध विभागात झालेले भ्रष्टाचार , आदिवासी तालुक्यातील पाण्याचा प्रश्न , आरोग्यासंबंधी निर्माण समस्या , दलित बौद्ध आदिवासी मुस्लिम , मागासवर्गीय समाजावरील वाढते अत्याचार , 29 जानेवारी 2020 रोजीच्या आंदोलनातील कलम 353 अन्वये दाखल गुन्हाबाबत , अश्या अनेक विषयांवर व निर्माण समस्यांबाबत सखोल चर्चा करण्यात आली. जिल्ह्यात संबंधित विभागांतील प्रश्न जलदगतीने मार्गी लावण्याकरीता कार्यकर्त्यांनी प्रत्येक्ष अधिकाऱ्यांना भेटून गोर गरीब जनतेचे प्रश्न मार्गी लावा अन्यथा आंदोलनाचा इशारा देऊन वेळप्रसंगी रस्त्यावर उतारा पण जनतेचे प्रश्न मार्गी लावा असे आदेश उपस्थित कार्यकर्त्यांना दिले. यावेळी कांग्रेसचे महाराष्ट्र सेक्रेटरी व पालघर जिल्हा सहप्रभारी यशवंतसिंह ठाकूर ,
राष्ट्रीय पँथर्स आघाडीचे अविश राऊत , पालघर जिल्हा अध्यक्ष जगदीश राऊत , लोकसभा अध्यक्ष बिंबेश जाधव ,जिल्हा कार्याध्यक्ष अरशद खान , सामाजिक कार्यकर्ते सलीम पटेल , जिल्हा उपाध्यक्ष रोहित चौधरी ,भावेश दिवेकर , महासचिव व प्रसिद्धी प्रमुख संतोष कांबळे , जिल्हा कोषाध्यक्ष भरत महाले , जिल्हा प्रमुख सल्लागार चंद्रसेन ठाकूर , जिल्हा महिला उपाध्यक्षा विद्याताई मोरे , स्नेहाताई जाधव , जिल्हा महिला कार्याध्यक्षा मारिना रिबेलो , डहाणू तालुका उपाध्यक्ष जीभाऊ अहिरे व कार्यकर्ते उपस्थित होते.