
दि.१८ विरार( राजेश जाधव) -महाकवी शाहीर वामनदादा कट्टा शुभारंभ सोहळा संपन्नमहामानव, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मैत्री संस्थे तर्फे सामाजिक, वैचारिक,व सांस्कृतिक प्रबोधनासाठी महाकवी, शाहीर वामनदादा कर्डक यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून रविवार दि.१७ एप्रिल २०२२ रोजी मनवेल पाडा, विरार पूर्व याठिकाणी वामनदादा कट्टा शुभारंभ सोहळा दिमाखात पार पडला.या वामनदादा कट्टा चे उद्घाटन डॉ बाबासाहेब आंबेडकर कृती समितीचे अध्यक्ष दिलीप सांळुंके, तसेच कार्याध्यक्ष, गटप्रतिनिधी सुरेश मंचेकर यांच्या हस्ते झाले.याप्रसंगी मैत्री संस्थेचे अध्यक्ष सूरज भोईर, सचिव राजेश जाधव, सल्लागार प्रज्योत मोरे, पालघर जिल्हा कार्याध्यक्ष विजय गोडबोले, तसेच महिला पदाधिकारी वनिता तोंडवलकर, पोलीस कुटुंब कल्याणकारी संस्थेचे अध्यक्ष प्रताप दुपारे, कवी लेखक सुनील असनकर उपस्थित होते.या कट्टा माध्यमातून दर दोन तीन महिन्यांनी मुंबई तसेच महाराष्ट्रातील विविध ठिकाणी सांस्कृतिक, सामाजिक,व वैचारिक प्रबोधन व विचार मंथन केले जाईल.या शुभारंभ सोहळ्याचे निवेदन प्रज्योत मोरे यांनी केले तर आभार प्रदर्शन राजेश जाधव यांनी केले.या संपूर्ण कार्यक्रमासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर कृती समितीचे आणि त्यांच्या सर्व पदाधिकार्यांचे विशेष सहकार्य लाभले.त्यात प्रामुख्याने अध्यक्ष दिलीप सांळुंके, उपाध्यक्ष प्रमोद तांबे, सरचिटणीस शंकर सुरडकर,सहचिटणीस अनिल नांद्रे, उत्तम जाधव, कार्याध्यक्ष सुरेश मंचेकर , कोषाध्यक्ष अमित खैरे, सल्लागार आत्माराम जाधव यांचे मोलाचे सहकार्य लाभले.