राजाराम मुळीक ह्यांच्या मागणीवरून महसूल व वने यांच्या प्रमुख अधिकाऱ्यांची तात्काळ बैठक संपन्न


वनखात्याच्या जागेवर झालेली सर्व बांधकामे ताबडतोब निष्कासित करण्याचे राज्यमंत्रांचे आदेश
वसई तालुक्यांमध्ये दिवसेंदिवस वनविभागाच्या जमिनीवर अतिक्रमण करून अनधिकृत बांधकामे वाढत आहेत तेथील अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी केल्या असता ते फक्त बघ्याची भूमिका घेत असतात. वनसंपदा ही वाचली पाहिजे त्यासाठी वने, पशु संवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय, सामान्य प्रशासन, जलसंधारण, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) राज्य मंत्री ना. दत्तामामा भरणे यांच्या दालनात वन खात्याच्या प्रमुख अधिकाऱ्यांची तसेच महसूल व वने यांच्या प्रमुख अधिकाऱ्यांची तात्काळ बैठक जिल्हाध्यक्ष राजाराम मुळीक ह्यांच्या मागणी वरून आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये वनखात्याच्या जागेवर झालेली सर्व बांधकामे ताबडतोब निष्कासित करण्याचा आदेश माननीय राज्यमंत्र्यांनी दिली आहेत तसेच अतिक्रमनास व अनधिकृत बांधकामास पाठीशी घालणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश वन खात्याच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत
सदर बैठकीस मुख्य वनसंरक्षक रामाराव राव उपवनसंरक्षक डहाणू श्रीमती मधुमिता कक्ष अधिकारी अपर्णा उपासने मॅडम वसई विरार शहर जिल्हाध्यक्ष तथा पालघर जिल्हा नियोजन समिती सदस्य राजाराम मुळीक तसेच महसूल व वन विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.