
प्रतिनिधी :
पालघर जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी लता सानप यांना २५ हजार रुपये लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून रंगेहात अटक करण्यात आली आहे. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून लता सानप यांची कसून चौकशी केली जात असून त्यांच्याकडे निश्चितच करोडोंचं घबाड सापडेल.
याबाबतची अधिक माहिती अशी की, पालघर जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी लता सखाराम सानप (५०) यांनी तक्रारदार यांच्याकडे वसई तालुक्यात नियुक्ती दिल्याचा मोबदला म्हणून रुपये ५०, ००० ची मागणी केली होती. तडजोडीनंतर २५,००० रुपये देण्याचे नक्की झाले. तक्रारदार यांनी सदर बाबत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केल्यानंतर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून लता सानप यांना २५ हजार रुपये लाच स्वीकारताना त्यांच्या घरूनच रंगेहात अटक केली.
लता सखाराम सानप यांची कसून चौकशी केली जात असून त्यांच्याकडे निश्चितच करोडोंचं घबाड सापडेल, यात अजिबात शंका नाही.
पालघर जिल्हा हद्दीत शेकडो अनधिकृत शाळा असून सदर शाळांवर कारवाई करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पालघर यांनी आदेश दिले आहेत. मात्र शिक्षणाधिकारी लता सानप यांनी लाच खाऊन सदर अनधिकृत शाळांवर कारवाई केली नाही.
सध्या लता सानप या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या कस्टडीत असून लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उप अधीक्षक नवनाथ जगताप, पोलीस निरीक्षक स्वपन बिश्वास, पोलीस हवालदार संजय सुतार, नवनाथ भगत, पागधरे, अमित चव्हाण, विलास भोये, मांजरेकर, स्वाती तारवी, सखाराम तोडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.