दि.२९ राजेश जाधव – पालघर मध्ये भव्य ओबीसी आक्रोश मोर्चा हक्क संघर्ष समिती पालघर जिल्हा यांच्या वतीने पालघर जिल्ह्यातील तमाम ओबीसी चा आक्रोश मोर्चा पालघर येथे पार पडला.या आक्रोश मोर्चा मध्ये सर्व राजकीय पक्षांनी सर्व जाती धर्माच्या लोकांनी या मोर्चाला आपला पाठिंबा दर्शविला.या मोर्चा मध्ये नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे , मंत्री छगन भुजबळ , खासदार कपिल पाटील, आमदार हितेंद्र ठाकूर यांनी सहभाग घेऊन आपली मतं व्यक्त केली.सगळ्यांच राजकीय पुढाऱ्यांनी आणि पदाधिकारी यांनी ओबीसी आरक्षण मिळालेच पाहिजे यासाठी जे जे आंदोलन करता येईल ते करत राहून ओबीसी च्या न्याय हक्कासाठी हि लढाई लढत राहू हि भूमिका घेतली.या पालघर जिल्ह्यात आदिवासींची संख्या देखील अमाप आहे. म्हणून एस सी ,एस टी आणि ओबीसी आरक्षण मिळालेच पाहिजे असं मत सर्वच राजकीय पक्षांनी घेतली आहे.              ओबीसी चे आरक्षण वाचविणे हा मुख्य मुद्दा असून भारत सरकारची मदत यावेळी घेणार .हा प्रश्न फक्त महाराष्ट्रातील ओबीसींचा नसून संपूर्ण भारतातील ओबीसी साठी हि लढाई आहे असं मत मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केलं.तर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी ओबीसी आरक्षण जो पर्यंत मिळत नाही तोपर्यंत ज्या ज्या लढाया रस्त्यावरील असतील किंवा कायदेशीर असतील ते लढत राहू सुप्रीम कोर्टात जे जे‌ पुरावे असतील ,एम्पेरियल डाटा असेल ते सगळे पुरावे युध्द पातळीवर देण्याची प्रक्रिया  संजय भांटीया यांच्या अध्यक्षतेखाली काम करतेय तसेच मंत्री छगन भुजबळ साहेबांची देखील एक कमिटी यावर काम करतेय ओबीसी समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे हि भूमिका मुख्यमंत्र्यांची आणि राज्य सरकारची आहे . तसेच ओबीसी समाजाला डावलून निवडणूका होऊ नयेत हि देखील भूमिका राज्य सरकारची असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं.या मोर्चाला पालघर जिल्ह्यातील हजारो ओबीसी बांधवांनी हजेरी लावून मोर्चा यशस्वी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *