दि.३० राजेश जाधव पनवेल येथील युसूफ मेहेर अली सेंटर चा हीरक महोत्सव आज ३० एप्रिल २०२२ रोजी उत्साहात संपन्न झाला.या हीरक महोत्सवाचे उद्घाटन मा.आदिती तटकरे ( विधी व न्याय मंत्री) यांच्या हस्ते झाले. तर डॉ.जी.जी.पारिख , मेधा पाटकर, हुसेन दलवाई यांच्या हस्ते संविधानाच्या सरनामाच्या फलकाचे अनावरण करण्यात आले.असंख्य सामाजिक कार्यकर्ते घडविणार्या या सेंटरची स्थापना १ मे १९६२ रोजी तत्कालीन उपराष्ट्रपती झाकिर हुसेन यांच्या हस्ते झाली .या सेंटरचे प्रमुख मार्गदर्शक ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ.जी.जी.पारिख यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक उपक्रम या संस्थेमार्फत राबविण्यात येते.तसेच या सेंटरच्या माध्यमातून पनवेल आणि आसपासच्या गावातील कातकरी , आदिवासी, यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी दोन मराठी शाळा, आणि एक उर्दू शाळेच्या माध्यमातून मोफत शिक्षण दिले जाते. तसेच या सेंटरच्या माध्यमातून मोफत आरोग्य शिबीर राबविण्यात येते. एक ३० ब्रेडचे हाॅस्पिटल मधून मोफत वैद्यकीय सेवा पुरविणाऱ्या येते. कुटीर उद्योगाच्या माध्यमातून येथील गावकऱ्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यात येते.तसेच गोशाळा, गांडूळ खताची निर्मिती करुन विक्री करण्यात येते.कुंभार कौशल्यातून वेगवेगळ्या प्रकारची भांडी तसेच मातीची बाॅटल बनविण्यात येतात. नैसर्गिक खोबरेल तेल गाण्यावर काढून विक्री करण्यात येते.नैसर्गिक घटकांपासून साबणाची निर्मिती, शिवणकाम,संगणक प्रशिक्षण देण्यात येते.दर आठवड्यात सामाजिक कार्यकर्ता चिंतन शिबिराचे आयोजन वेगवेगळ्या संस्थेच्या माध्यमातून करण्यात येते.अशा या असंख्य सामाजिक कार्यकर्ते घडविणार्या सेंटरचा हीरक महोत्सव उत्साहात पार पडला.या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून विधी व न्याय मंत्री आदिती तटकरे ,रायगडचे जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर , महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी,माजी खासदार हुसेन दलवाई, विचारवंत इरफान इंजिनिअर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर हे उपस्थित होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षा उषा शाह ( अध्यक्ष युसूफ मेहेर सेंटर ) या होत्या .तर प्रमुख मार्गदर्शक ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ.जी.जी.पारिख यांच मोलाचं मार्गदर्शन लाभलं.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मधूकर मोहिते आणि देविदास पाटील यांनी केले.महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यातून असंख्य सामाजिक कार्यकर्ते या कार्यक्रमाला उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *