

याचे उत्तर होय असंच आहे.
जिथे कोणी नसतो.
तिथे फक्त आणि फक्त पोलीस असतो…
तिवरे धरण फुटून आज चार दिवस झाले.महाराष्ट्रभर हाहाकार उडाला. धरण फुटून आयुष्यातून उद्ध्वस्त झाल्याची अवस्था तर सांगण्यासारखी नाहीच.जिवाभावाची माणसं गेली. आईची माया गेली. बायकोचा पदर गेला. घर-दार गुरंढोरं अक्षरशा वाहून गेले.रात्र भयानक होती. दिवस उजाडला आणि नजरा गाव शोधत होते.पण सगळं धुळीला मिळालं होत. डोळ्यात फक्त अश्रू होते आणि नजरेमध्ये कायमचं सोडून गेलेल्या आपल्या जवळच्या माणसाचा शोध होता. काही लोक मदतीला धावून आले.बघ्या लोकांची गर्दी तर तुफान होती. ही परिस्थिती बघून काही जन मनापासून हळहळले.काही रडले. पण बर्यापैकी लोक धरण कसे फुटले हे पाहण्यासाठीच आले होते.
बघे आले निघून गेले. काही बोटावर मोजण्याइतपत एनजीओने लोकांना मदत केली. एनडीआरएफ खडतर वातावरणातही आजही मृतदेहांचा शोध घेत आहे…
यासोबत आजही एक घटक धरण फुटले पासून कार्यरत आहे. तो म्हणजे पोलीस, धरण फुटल्या पासुन अवघ्या काही मिनिटात घटनास्थळी पोहोचले ते म्हणजे पोलिसच होय. पाण्याचा लोंढा जोरात असतानाच काही बोटावर मोजण्याइतपत लोकांना घेऊन पहिल्यांदा पोलिस पोचले. त्याही भयानक परिस्थितीत वाचलेल्या वीस लोकांना आधार आणि धीर दिला.आजही उभ्या पावसात उभा राहून धरणाच्या आसपास कोणी जाऊ नये याची काळजी आत्ताही घेत आहे.
परिस्थिती नियंत्रणात आल्यावर भेंड वाडीतील लोक जेव्हा वाचलेल्या घरातील चिखल दोन दोन दिवसापासून उपसत होते. त्यावेळी मात्र त्यांना कोणीही मदत करत नव्हते. आता सगळे बघे निघून गेले होते. डोळ्यातील अश्रू डोळ्यात रिचवून ते घरातील गाळ काढण्याचा प्रयत्न करत असताना बंदोबस्तावरील पोलिसांना ते पहावले नाही. आणि त्यांनी स्वतःच कपडे काढून दीपक धडवे व त्यांच्या भावाला मदत केली. त्यावेळी त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. किती आले,किती गेले.पण कुणाला हे सुचलं नाही.तुम्ही मदत केली. तुमचे मनापासून आभारी आहे. हे जेव्हा पोलिसांना भावाभावानी हात जोडून आभार मानले…