
वसई (प्रतिनिधी ):– महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्यातील सातत्यपुर्ण गुणवत्तापूर्वक कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी यांना पोलीस महासंचालक पदक घोषित करण्यात आले. राज्यभरातून एकूण पाचशे पोलीस निरीक्षक नामांकित झालेल्या अधिकारी मधून सर्वोत्तम कामगिरी असणाऱ्या ४६ पोलीस निरीक्षक यांना सदर पदक घोषित झाले.
वसई विरार मिरा-भाईंदर पोलीस आयुक्तालया अंतर्गत पेल्हार पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास चौगुले यांची सदर पदक साठी निवड झालेली आहे.
ठाणे पोलीस आयुक्तालया अंतर्गत कार्यरत असताना खंडणी विरोधी पथक, लाचलुचपत शाखेत दैदिप्यमान कामगिरी केलेली आहे.