लोकनेते, आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या संकल्पनेतून स्व. गोपीकिसन पाटील यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून बहुजन विकास आघाडी जुचंद्र नायगाव पुर्वच्या वतीने कोरोनाकाळात आपली सेवा दिलेल्या कोरोना योद्धांचा सन्मान करण्यात आला. यासोबत महिला मेळावाही मोठ्या उत्साहपुर्ण वातावरणात संपन्न झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रथम महिला महापौर प्रविणा हितेंद्र ठाकूर, माजी महिला बालकल्याण सभापती माया चौधरी, माजी सभापती रमेश घोरकना, कन्हैया (बेटा) भोईर, पंचायत समिती सदस्या शुभांगी बेंद्रे, बहुजन विकास आघाडीचे विवेकानंद पाटील, मोरेश्वर पाटील, बन्सीलाल भोईर, दत्ताराम भोईर, विनय पाटील तसेच युवा कार्यकर्ते व मोठ्या संख्येने महिला कायकर्त्यां उपस्थित होत्या. महिला मेळाव्यास महिलांची व कार्यकर्त्यांची उपस्थिती लक्षणीय होती. यावेळी स्व. गोपीकिसन पाटील यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली.  

कोरोनासारख्या कठीण काळात अनेकांनी आपल्या जिवाची पर्वा न करता त्यांना दिलेली जबाबदारी व कार्ये ईमानेइतबारे पार पाडली. राष्ट्रहितासाठीच्या त्यांच्या या कार्यामुळे कोरोना महामारीचा सामना अखंड भारत देशाने मोठ्या धैर्याने व एकजुटीने केला. या समर्पित भावनेतून बहुजन विकास आघाडी जुचंद्र नायगाव पुर्व परिवारातर्फे येथील कोरोना योद्धांचा सन्मान करण्यात आला. डॉक्टर्स व स्टाफ, पत्रकार वर्ग, पोलीस विभाग, आरोग्य विभाग, स्वच्छता दूत, अग्निशमन विभाग, जुचंद्र माता बालसंगोपन केंद्र, अंगणवाडी सेविका, आशा वर्कस, रेशनिंग धान्य महिला बचत गट, मेडीकल विभाग, वीज कर्मचारी, रूग्णवाहिका सेवा, पक्षाचे कार्यकर्ते व रिक्षा सेवा अशा विविध क्षेत्रातील एकूण 650 कोरोना योद्धांचा सन्मानचिन्ह व आकर्षक बॅग देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी महाराष्ट्राची कला संस्कृती, डान्स, सायकलिंग व क्रिकेटमध्ये जुचंद्र गावाचे नाव उज्वल केल्याबद्दल चौघांचा विशेष सत्कार करण्यात आला. आपल्या कार्याचा यथोचित सन्मान झाल्याबद्दल अनेकजण भाराऊन गेले व त्यांनी आयोजकांचे विशेष आभार मानले.

कोरोना योद्धांचा सन्मान सोहळ्यासहीतच महिला मेळाव्यामध्ये होम मिनीस्टर व लकी ड्रॉ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास तब्बल 4000 नागरीकांनी आपली उपस्थिती दर्शविली होती तसेच प्रत्येक महिलेस लकी ड्रॉ कुपन देण्यात आले होते. या कुपनव्दारे होम मिनीस्टर कार्यक्रमात लकी ड्रॉव्दारे 20 येवला पैठणींचे विजेत्या महिलांना वाटप करण्यात आले. तसेच 200 आकर्षक बक्षिसे वाटप करण्यात आली. पैठणी व भेटवस्तू विजेत्या महिला विलक्षण आनंदी दिसून येत होत्या. र्यक्रमास येणाऱ्या प्रत्येकास भेटवस्तू म्हणून एक आकर्षक हॅन्ड बॅग देण्यात आली. यामध्ये एकूण 4000 हॅन्ड बॅगचे वाटप करण्यात आले.

कोरोनाच्या कठीण काळात बहुजन विकास आघाडीचा प्रत्येक कार्यकर्त्यांने गरजवंतांची मदत केली. त्याचा मला व सर्वांना सार्थ अभिमान असल्याचे प्रथम महिला महापौर प्रविणा ठाकूर यांनी आपले मत व्यक्त केले. तसेच एका सुंदर कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल बहुजन विकास आघाडी नायगाव पुर्वच्या संपुर्ण टिमचे कौतुक केले. या कार्यक्रमासाठी माजी सभापती कन्हैया भोईर यांनी विशेष पुढाकार घेतलेला होता. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन भावेश म्हात्रे व आशिष पाटील यांनी केले. हा संपुर्ण सोहळा ड्रोन व टिसीपी इव्हेंटव्दारे युट्युबवर लाईव्ह दाखविण्यात आला होता. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी बहुजन विकास आघाडी नायगाव पुर्वच्या प्रत्येक पुरूष व महिला कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *