

वसई विरार शहर महानगरपालिका वैद्यकीय आरोग्य विभागामार्फत मा.आयुक्त महोदयांच्या मार्गदर्शनानुसार सोमवार दि.०२ मे, २०२२ रोजी प्रभाग समिती ‘सी’ चंदनसार व प्रभाग समिती ‘आय’ वसई गाव येथील अधिकारी व कर्मचारी यांचे आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते.
नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र चंदनसार अंतर्गत प्रभाग समिती ‘सी’ चंदनसार येथील आरोग्य तपासणी शिबीरात एकूण ७१ अधिकारी व कर्मचारी यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. त्याचप्रमाणे १४ लाभार्थ्यांचे कोविड-१९ प्रिकॉशन डोसचे लसीकरण करण्यात आले. सदर शिबिरास महानगरपालिका उप-आयुक्त डॉ.विजयकुमार द्वासे, उप-आयुक्त श्रीमती नयना ससाणे, उप-आयुक्त श्री.तानाजी नरळे, मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.भक्ती चौधरी, उप वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.अनिरुद्ध भेले, आर सी एच डॉ.अश्विनी माने, डॉ.रिद्धी पाटील व इतर कर्मचारी उपस्थित होते.
तसेच नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र वसई अंतर्गत प्रभाग समिती ‘आय’ वसई गाव येथील आरोग्य तपासणी शिबीरात एकूण ३८ अधिकारी व कर्मचारी यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. शिबिरास प्र.सहा.आयुक्त श्रीमती श्रद्धा मोंभरकर, वैद्यकीय अधिकारी डी एम पेटीट हॉस्पिटल डॉ.वैभव गायकवाड, वैद्यकीय अधिकारी ना.प्रा.आ.केंद्र वसई डॉ.वसंत पाटील व इतर कर्मचारी उपस्थित होते.
सदर आरोग्य शिबिरांतर्गत अधिकारी व कर्मचारी यांची रक्तदाब तपासणी, ई सी जी, Inj. TT, रक्त चाचणी, मधुमेह तपासणी इ.आरोग्य तपासण्या करण्यात येऊन मोफत औषधांचे वाटप करण्यात आले व त्यांना योग्य मार्गदर्शन व संदर्भ सेवा देण्यात आली. त्याचप्रमाणे शिबिरात अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कोविड-१९ प्रिकॉशन डोसचे लसीकरणही आले.
सदर आरोग्य शिबीर दि.०६ मे,२०२२ पर्यंत सुरु राहणार असून सर्व महानगरपालिका कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे.