
मांडवी वनपरिक्षेत्र कार्यालयात शासनाने चालक दिला असून देखील तेथील अधिकारी यांनी स्वतःच्या फायद्यासाठी सिद्धेश जाधव यास ठेक्यावर चालक म्हणून ठेवून तेथील शासकीय चालक यास भाताने येथे वाहन नसलेल्या ठिकाणी बदली वर पाठवले होते ही बाब पत्रकार मित्र तसेच काही समाजसेवक ह्यांनी वनखात्याच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देखील कोणतीही कारवाई होत नव्हती ही बाब काही पत्रकार मित्रांनी राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष राजाराम मुळीक यांच्या निदर्शनास आणून दिली हे प्रकरण अत्यन्त गम्भीर असल्यामुळे ही तक्रार राजाराम मुळीक यांनी उपवनसंरक्षक डहाणू यांच्याकडे केली परंतु उपवनसंरक्षक डहाणू यांच्याकडून कोणतीही दखल न घेतल्यामुळे याबाबतची तक्रार माननीय वनमंत्री नामदार दत्तामामा भरणे यांच्या दालनात वनाधिकाऱ्यांच्या होत असलेल्या बैठकीमध्ये केली. माननीय मंत्री महोदयांनी या प्रकरणाची गम्भीर दखल घेत तात्काळ चौकशी करून संबंधित ठेका वरील चालकास काढून टाकून अधिकाऱ्याची चौकशी करण्याचे आदेश दिले त्यानुसार सिद्धेश जाधव यास कामावरून कमी करण्यात आले आहे मांडवी वनपरिक्षेत्र दलाल मुक्त झाल्यामुळे नागरिकांकडून मंत्री महोदय व जिल्हाध्यक्ष राजाराम यांचे सर्व स्तरातून आभार मानण्यात येत आहेत