पालघर : पालघर मधल्या डहाणू येथील महाराष्ट्र – गुजरात सीमेवर असलेल्या बल्लाळ गडावर संवर्धन कार्य करते वेळी काही ऐतिहासिक तोफेचे तुकडे सापडले आहेत. दिनांक 17 एप्रिल 2022 रोजी DR फोर्स या दुर्ग संस्थेने मोहीम आयोजित केली होती. त्या दिवशी गडावरील झाडे झुडपे साफ करुन व काटेरी वृक्ष काढण्याचे काम प्रथम हाती घेण्यात आले होते. त्यानंतर बालेकिल्ल्याचा महादरवाजा संवर्धन कार्य सुरु असताना मातीच्या ढिगाऱ्या खाली शेकडो वर्षाचे दगड पडलेले ते बाजूला करीत असताना अचानक महादरवाज्याच्या एका दगडाखाली असणारी एक ऐतिहासिक वास्तू नजरेस पडली ती वास्तू म्हणजे मराठेशाहीच्या तोफेचा एक तुकडा होता. दगड बाजूला करुन ती बाहेर काढण्यात आली. त्यावेळी कार्य करणाऱ्या सर्वच शिवप्रेमीच्या चेहऱ्यावर आनंद ओसडून वाहताना दिसला. किल्ला बोलका झाला होता. त्यामुळे सर्वांच्याच मनात किल्याविषयीची आतुरता संपूस्टात आली होती. एवढ्या दिवसाच्या मेहनतीचं पहिलं फळ या गडाने दिलं. आज जरी मूटभर हात असतील तरी आज ना उद्या या किल्याच्या संवर्धनासाठी असे अनके हात मोहिमेला यावेत असे आव्हान DR फोर्स चे संस्थापक जयकांत शिक्रे यांनी केले आहे. सर्वधन कार्यासाठी ज्यांना कुणाला आवड असेल किंवा मदत कार्य कारायचे असेल त्यांनी 9404899007 नंबर वर सपंर्क साधवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *