
प्रतिनिधी : भिम प्रेरणा जागृती संस्था नऊ गाव वसई पश्चिम विभाग यांच्या विद्यमाने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंती निमित्ताने चक्रवर्ती सम्राट अशोक, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, बिरसा मुंडा व मदर तेरेजा यांची संयुक्त जयंती महोत्सव नाळा तानिया कंपाऊंड, आंबेडकर नगर येथे संयुक्त जयंती महोत्सव संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरूवात सकाळी १०.३० वाजता बुद्ध वंदनेपासुन करण्यात आली भारतीय बौद्ध महासभेचे बौध्दर्चाय आद.संतोष जाधव गुरूजी व भारतीय बौद्ध महासभा वसई पश्चिम शाखेचे अध्यक्ष आयु. मंगेश मोहिते व पदाधिकारी यांच्या अधिपत्याखाली बौद्ध विधी संपन्न झाली. सायंकाळी ४.३० वाजता भव्य अशी सजलेल्या रथात महापुरुषांच्या प्रतिमा ठेवून मिरवणूक काढण्यात आली. सदर मिरवणूक शिस्तबद्ध सामाजिक संदेश देत मिरवणूक काढण्यात आली मिरवणुकीत समता सैनिक दलाचे मोठे योगदान राहिले. मिरवणूक संपल्यानंतर सायंकाळी ७.०० वाजता नाळे तानिया कंपाऊंड मध्ये जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेचे प्रमुख वक्ते होते अँड. विजय कुर्ले इंडियन बार असोसिएशन महाराष्ट्र राज्य गोवा : अध्यक्ष, त्याच प्रमाणे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते अँड चेतन भोईर (भिम प्रेरणा जागृती संस्था : अध्यक्ष), प्रमुख पाहुणे होते मा. दिनेश कांबळे (माजी कुलसचिव मुंबई विद्यापीठ), मा. रूपेश जाधव (माजी महापौर व.वि.श.मनपा), मा.किरणजी गायकवाड (भारतीय बौद्ध महासभा पालघर जिल्हा : अध्यक्ष), मा. दत्तात्रय धुळे (वसई तालुका बौद्ध युवक संघ-अध्यक्ष), मा. दत्ता साबरे (आदिवासी एकता परिषद), सौ.संगिता राऊत (माजी नगरसेविका व.वि.श.मनपा), असे अनेक मान्यवर व नऊ गावातील अध्यक्ष उपस्थित होते. पाहुण्याचे स्वागत व विशेष आकर्षण राहिले ते म्हणजे तथागत ब्रास बँड (आंबेडकर नगर भुईगाव डोंगरी) त्याच प्रमाणे रानगाव व सत्पाळा येथून आलेले बँड पथक यांनी पाहुणे मंडळी यांची मन जिंकली. रानगाव-पंचशील नगर, गौतमनगर (निर्मळ) आंबेडकर नगर (भुईगाव डोंगरी),सम्राट अशोक नगर (बोळींज), भिम नगर (सत्पाळा), आंबेडकर नगर (आगाशी),सिध्दार्थ नगर (कळंब), आंबेडकर वाडी (नाळा), आंबेडकर शेजोळ (चुळणे) नऊ गावातील नऊ अध्यक्ष व ग्रामस्थ मोठ्या संखेने उपस्थित होते. नऊ गावातून आलेल्या अध्यक्षाना व पाहुणे मंडळीना सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. सभा संपल्यानंतर सांकृतिक कार्यक्रम व जाहीर भोजन करण्यात आले. दिक्षा महेश जाधव हिने संविधानाची प्रस्थावना बोलुन दाखविली व उपस्थितांकडून बोलुन घेतली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन महेश जाधव व राजेश जाधव आणि अजू जाधव यांनी केले. आलेल्या सर्व मान्यवर, पाहुणे मंडळी, ग्रामस्थ यांचे आभार संस्थेचे अध्यक्ष अँड.चेतन भोईर यांनी मानले.