

दोन वर्षांपूर्वी संपूर्ण देशात कोरीना महामारिने हाहाकार माजविला होता. टाळेबंदी काळात नागरिकांना घराबाहेर पडणे देखील मुश्किल झाले होते.अशा वेळी का मंन येथील समाज सेवक हजरत शेख स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आपल्या शंभर सहकाऱ्यांना सोबत घेऊन मुंबई ठाणे पालघर या ठिकाणी *देवदूत* बनून वैद्यकीय साहित्य, पोलिसांना लागणारे सहकार्य नागरिकांना लागणारे डाळ,पाणी पासून इतर जीवनोपयोगी वस्तू, याची मदत करत होते .स्वतःबरोबरच त्यांच्या 100 लोकांचा जीव धोक्यात घालून त्यांनी ही सेवा अखंडितपणे सुरू ठेवली होती .सध्या राज्यात तणाव दडपणाचे असलेले वातावरण, त्यातच रमजान ईद व अक्षय तृतीया हे हिंदू-मुस्लीम यांचे दोन्हीं सण एकाच वेळी आले. त्यामुळे पोलीस प्रशासन यांना देखील मोठ्या प्रमाणात दडपून आला होता. संपूर्ण राज्यात शांतता हवामान कसा राहील यासाठी पोलीस प्रशासन व विविध राजकीय पक्ष प्रामाणिक प्रयत्न करत होते. या दुग्धशर्करा योगाचा चांगला उपयोग करून घेण्याचा कामांमधील उद्योजक व समाजसेवक यांच्या मनात आले व त्यांनी ती कल्पना दोन्ही समाजातील लोकांना व पोलिसांना सांगून तात्काळ अमलात आणली. महाराष्ट्रातील सध्याची परिस्थिती व पोलिसांवरील दडपण वक्ता या कठीण काळात हजरत शेख *शांतिदूत* बनून पुढे आले व त्यांनी कामंन व पंचक्रोशीतील आजूबाजूच्या गावांत, समानता ,बंधुता ,सर्व धर्म- समभाव , अमन व शांती करिता हिंदू व मुस्लिम धर्मीयांचे सण एकत्रितपणे साजरे केले व का मणगावत धर्म स्वभाव शांती अमन सौहार्दता यांचीअसलेली दोनशे वर्षाची परंपरा अक्षयतृतीया व रमजान ईद एकत्र साजरी करून कायम ठेवली. यासाठी वालीव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कैलास बर्वे, हिंदू समाजातील व सामाजिक क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्ती किशन पाटील महादेव पाटील, कमंन चे माजी उपसरपंच एडवोकेट दिनेश म्हात्रे, जयंत म्हात्रे, देवदल ग्रामपंचायत चे माजी सरपंच कमलाकर पाटील, पोमान गावचे माजी सरपंच दयानंद वाघ, चिंचोटी चे धडाडीचे कार्यकर्ते शरद भगळी ,समाजसेवक मनोहर गुप्ता, मुन्ना गुप्ता तसेच जामा मशीद अल्हेहादिस कामंन ट्रस्टचे पदाधिकारी ,हजरत शेख नूर शेख, शाहिद सत्तार अन्सारी, शाकीर मोहम्मद अली अन्सारी, अफझल सत्तार अन्सारी ,असलम युनूस शेख इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कामंन व आजूबाजूच्या परिसरातील भजनी मंडळ यांचे पदाधिकारी देखिल या ठिकाणी मोठ्या उत्साहाने सहभागी झाल्या होते. याबाबत सविस्तर वृत्त असे की संपूर्ण राज्यात सध्या किती पूर्ण तणावयुक्त वातावरण आहे जाणीव प्रत्येकाला आहे. को रोना काळात दोन वर्ष सर्वच धर्मातील नागरिकांना आपले सण मुक्तपणे साजरे करण्याची संधी व सवलत मिळाली नव्हती .दोन वर्ष कोरोणा मुळे अनेक वेळा टाळेबंदी लागली तर अनेक नियम लादण्यात आले होते .त्यामुळे कोणालाही मुक्तपणे कोणतेच सण व उत्सव साजरा करण्याची संधी मिळाली नव्हती.यंदा प्रथमच बंधन व निर्बंध उठविले त्यामुळे सर्व समाजाने आपले सण, उत्सव मोठ्या उत्साहाने साजरे केले दरम्यानच्या काळात काही करणामुळे सद्याचे वातावरण तणावग्रस्त असताना प्रत्येक जण अमन व शांततेसाठी प्रयत्न करत होते .अशातच कामंन येतील उद्योजक व समाजसेवक *हजरत शेख* यांनी पुढाकार घेऊन *शांतीदूत* बनून पुढें आले.नागले शारजा मोरी, मोरी ,पोमण, कामं न , देवदल, चिंचोटी, कोल्हीं परिसरातील अमन व शांती अबाधित राहावी, सामाजिक सौहार्दता टिकावी, सामाजिक बांधिलकी यासाठी एक छोटासा प्रयत्न केला व *अक्षय तृतीय* *रमजान ईद* या हिंदू-मुस्लीम सणाचा जुळून आलेला *दुग्धशर्करा* योग त्याचा उपयोग समाजातील शांती व अमन कायम राखण्यासाठी करून घेतला .अत्यंत कमी वेळात व नीट नेटके नियोजन करुन हिंदू व मुस्लीम समा जातील दोन्ही लोकांना एकत्रित करून दोन्ही सण मोठया आनंदाने साजरे करण्यात आले. हिंदू बांधवांनी मुस्लिम बांधवांना पुरणपोळी भरून तर मुस्लीम बांधवांनी हिंदू बांधवांना शीरखुर्मा, मिठाई वाटली, हा सण मोठ्या जल्लोषात साजरा केला. संपूर्ण राज्यात तणावयुक्त वातावरण आ सताना कामंन व परिसरात अमन शांतता कायम राखण्यासाठी पोलिसांच्या सहकार्याने व दोन्ही समाजातील नागरिकांच्या पुढाकाराने दोन्ही समाजातील सण अत्यंत खेळीमेळीच्या ,आनंदाच्या, वातावरणात साजरे करण्यात आले. अत्यंत कमी वेळात हजरत शेख यांनी गावात राहणाऱ्या हिंदू व मुस्लिम बांधवांना दोन्हीं सण एकत्र साजरे करण्याचे सांगितले. जी अद्भुत कल्पना दोन्ही समाजातील लोकांना उचलून धरली व तात्काळ दोन्हीं सण साजरी एकत्र साजरे करण्यास अनुमती दिली. त्याच बरोबर वालिव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कैलास बर्वे यांना देखील ही कल्पना आवडली त्यांनी देखिल परवानगी दिली व स्वतः या सणाला स्वतहून हजेरी लावली व हिंदू व मुस्लिम बांधवांबरोबर हा सण उत्साहात साजरा केला. यावेळी पोलीस कर्मचारी, अधिकारी ,दोन्ही समाजातील उपस्थित मान्यवर यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला . अशाप्रकारे हिंदू-मुस्लीम समाजातील दोन्ही सण एकत्रित रित्या ,आनंदाने साजरे करण्याची महाराष्ट्रातील एक दुर्मीळ गोष्ट असावी यासाठी राज्य शासनाने या या गोष्टीची दखल घेऊन अशा प्रकारे दोन्ही समाजातील विचारवंत मान्यवर यांना एकत्र येऊन असे सण साजरे केल्यास अनेकांचे सामजिक शांतता सौहार्दता, अमन ,भंग करण्याचा कुटील डाव व मनसुबे नक्कीच उधळून लावले जातील. कोरो ना काळात देखील हे हजरत शेख *देवदूत* बनून सर्वांसाठी पुढे आले . हजारो घराघरात तेल, तांदूळ, भाजी आणि बिस्कीट, इत्यादी जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा त्यांनी त्यांच्या सकर्यानी अविरतपणे सुरू ठेवला होता. आपल्या जिवाची पर्वा न करता एवढ्या महामारी च्या काळात आपल्या शंभर साथीदारांना बरोबर घेऊन त्यांनी जे काम केले.. त्याला तोड नाही त्याचबरोबर वैद्यकीय सेवा करणारे डॉक्टर त्यांना लागणारे साहित्य, दिवस रात्री ड्युटी करणारे पोलीस अधिकारी, कर्मचारी यांना लागणारे पाणी नाश्ता यांचीदेखील व्यवस्था निस्वार्थीपणे आली होती. समाजात अनेक जण श्रीमंत आहेत. मात्र सामाजिक *दृष्टि* *कोना* तून विचार करुन आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो हा सामजिक विचार करणाऱ्या लोकां पैकी कामांन मधील *हजरत* *शेख* हे एक आहेत. सध्याच्या तनाव युक्त वातावरणात कामंन व पंचक्रोशीतील शांतता कायम राखण्यासाठी हजरत शेख यांनी उचललेले पाऊल अत्यंत महत्वाचं व योग्य वेळी योग्य घेतलेला निर्णय म्हणावा लागेल. यासाठी राज्य शासनाने तथा मीरा-भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्त सदानंद दाते यांनी याची दखल घेऊन त्यांचा योग्य तो सन्मान केला पाहिजे . जनेकरून समाजातील अनेक समाजसेवक पुढे येऊन समाजात शांतता कायदा सुव्यवस्था सामाजिक सौहार्द अबाधित राखण्यासाठी सर्वांना प्रोत्साहन मिळेल .हजरत शेख यांनी उचललेलं पाऊल याची राज्यात अंमलबजावणी करण्याच्या *दृष्टिकोनातून* देखील विचार व्हावा असा विचार पुढे येत आहे. या कार्यक्रमाला हिंदू व मुस्लिम समाजातील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यांची नावे पुढे देत आहोत.