
वसई पश्चिमेतील पापडी तलाव येथील राम मंदिराच्या बाजूला तुटलेल्या दरवाजा अंगावर पडून दबून ५ वर्षांच्या निष्पाप मुलीचा मृत्यू झाला. गेल्या अनेक दिवसांपासून हा तुटलेला फाटक तसाच निष्काळजीपणे ठेवला होता या तलावाचे बांधकाम झाल्यापासून तलावाचे पुर्ण काम केली नसल्याची माहिती आहे सुशोभीकरण च्या नावाखाली लाखो रुपये ठेकेदारांनी लाठले. पणं काम पुर्ण केले नाही गार्डन व तलाव करिता लाखो रुपये सुरक्षा रक्षक पगार पोटी खर्च होत आहे पण प्रत्यक्षात त्या ठिकाणीं सुरक्षा रक्षक नेमले जाात नाही. हाच बहुजन प्रकाश आहे पापडी तलावावर आपल्या आजी सोबत कपडे धुण्यासाठी गेलेल्या मुलीला महापालिकेच्या राक्षसी प्रवृत्तीच्या अधिकाऱ्याची निष्काळजी पणा त्या कोवळ्या मुलीच्या जीवावर बेतले .सदर प्रकरणी वसई पोलीस नी देखील कागदी खानापूर्ती करुण अपघाती मृत्यू म्हणून नोंद करुण आपले कर्तव्य पार पाडले .याबाबतची अधिक माहिती अशी की, वसई विरार शहर महानगरपालिका प्रभाग समिती आय हद्दीत असलेल्या पापडी येथील शेजारी भूमिका मेहेर आपल्या आई सोबत मायलेकी राहत होते अतिशय हलाखीच्या परिस्थितीत त्या आपले जीवन जगत होत्या . त्या आई च जगण्याचा एकमेव सहारा भूमिका गेल्याने त्या आई वर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.सदर तलावाबाबत अजून एक बातमी समोर आली आहे. सदर तलावाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम चालू असताना तलावाची भिंत कोसळली होती. या कामाचा ठेका मुकेश ब्रदर्स या कंपनीला देण्यात आला होता. निकृष्ट दर्जाचे बांधकाम केल्यामुळेच भिंत कोसळली होती. मात्र त्यावेळी महानगरपालिकेकडून सदर ठेकेदारावर कोणतीही कारवाई झाली नव्हती. कारवाई का झाली नाही? अर्थातच महानगरपालिका अधिकारी व ठेकेदार यांच्या अभद्र युतीमुळेच ठेकेदारावर कोणतीही कारवाई झाली नाही. पापडी तलाव हा वसईतील जुन्या तलावांपैकी एक आहे, त्याचे अनेकवेळा सुशोभीकरण व दुरुस्ती करण्यात आली आहे. परंतु देखभालीअभावी तलावाच्या आजूबाजूचे मोठे लोखंडी गेट तुटले आहेत मात्र याकडे पालिकेचे लक्ष नाही. महापालिकेच्या या बेफिकीर वृत्तीमुळे आज एवढी मोठी दुर्घटना घडली आणि एका निष्पाप मुलीचा मृत्यू झाला. या बाबत भाजप वसई शहर मंडळ. अतिशय आक्रमक असुन मंडळाचे सरचिटणीस नंदकुमार महाजन अमित पवार सुचिता शेट्टी रोजिणा वर्तक वार्ड अध्यक्ष रूपाली वर्तक जिल्हा सचिव किरणं पाटील यांनी तात्काळ सदर कुटुंबीय ना भेट देवुन त्यांचें सात्वन करून त्यांना दिलासा दिला.काहितरी कारवाई झाली पाहिजे अशी तलावाच्या शेजारील लोकांची मागणी आहे. म्हणून भाजप टीम ने त्वरीत वसई पोलीस स्टेशन गाठले रीतसर पत्र देवुन बेजबाबदार महापालिका प्रशासन अधिकारी ठेकेदार यांच्यावर रीतसर तपास करून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे अन्यथा भाजप तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.