

प्रतिनिधी : दलित पँथर पालघर जिल्ह्याच्या वतीने बहुजन क्रांती मोर्च्याच्या माध्यमातून देशभरात होत असलेल्या मॉब लिंचिंगच्या विरोधातील धरणा प्रदर्शनाला जाहीर सक्रिय पाठिंबा देण्यात आला.या धरणा प्रदर्शनामधे जिल्ह्यातिल दलित पँथरचे कार्यकर्ते मोठ्या संखेने सहभागी झाले होते.
संध्या देशात मॉब लिंचिंगच्या माध्यमातुन दलित मुस्लिम बांधवांना टार्गेट केले जात असुन, अमानुषपणे मारहाण करण्यात येऊन धार्मिक नारे लावण्यास परावृत्त केले जात आहे.झारखंडमधे तरबेज अन्सारी या मुस्लिम युवकाला खांबाला बांधुन अमानुष पद्धतीने मारहाण करण्यात आल्याने त्या मारहाणीत त्याचा नंतर हॉस्पिटलमधे मृत्यु झाला. असेच या अगोदर मुजफ्फरनगर मध्ये एका दलित युवकाला भर चाैकात लाता बुंक्यानी मारहाण करुन त्यास धार्मिक नारे लावण्यास भाग पाडण्यात आले. अशा अनेक घटना समोर येत असुन, वारंवार होणार्या मॉब लिंचिंगच्या घटनांचा देशभरात दलित मुस्लिम नागरिकांमधे असंतोष व भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मॉब लिंचिंग सारख्या अमानवीय राक्षसी विकृती घटनेमुळे देशाच्या अखंडतेला बाधा पोचत असुन, या मुळे पीडितांना जीव गमवावा लागत आहे.या घटनांचा देशाच्या लोकशाही व संविधानाला आघात असुन,केंद्र व राज्य सरकारने मॉब लिंचिंग सारखे प्रकार पुन्हा घडु नयेत म्हणुन त्वरित कठोर कायदा अमलात आणावा व पिडितांना न्याय मिळवून द्यावा.परंतु सरकारने झोपेचे सोंग घेतल्याने व सरकारची इच्छाशक्ति नसल्याने धर्मांध शक्तीचे मनसुब्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असुन,मॉब लिंचिंग सारख्या घटना वारंवार देशात राजरोस पणे घडत आहेत.त्यामुळे झोपलेल्या सरकारला जागे करण्यासाठी बहुजन क्रांती मोर्चाच्या माध्यमातुन देशभरात प्रत्येक जिल्ह्यात धरणा प्रदर्शन करण्यात आले. सदर धरना प्रदर्शनमध्ये दलित पँथर पुर्णत: साथ सहयोग पाठिंबा देऊन, देशात होणार्या मॉब लिंचिंग च्या विरोधात मा.जिल्हाधिकारी साहेब पालघर द्वारा मा.महामहिम राष्ट्रपती भारत सरकार यांना निवेदन सादर करण्यात आले.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष मा.अविश राऊत, जिल्हा उपाध्यक्ष अरशद खान व लहानु डोबा, जिल्हा महासचिव जगदीश राऊत,जिल्हाकोषाध्यक्ष भरत महाले,जिल्हा सचिव व जिल्हा प्रसिद्धी प्रमुख संतोष कांबळे, पालघर तालुकाध्यक्ष रोहित चाैधरी, पालघर तालुका उपाध्यक्ष अहमद खान , तालुका कार्यकारणी जावेद खान,पालघर तालुका कार्यकारणी प्रमुख सल्लागार किशोर राऊत व निलेश गायकवाड, डहाणू तालुकाध्यक्ष विनायक जाधव, डहाणु तालुका कार्याध्यक्ष आफताब पठान, डहाणू तालुका उपाध्यक्ष शिवप्रसाद कांबळे, डहाणू उपकार्याध्यक्ष किसन गोरखाना, महिला जिल्हाध्यक्षा चंदना जाधव, महिला जिल्हा उपाध्यक्षा मोहिनी जाधव, तालुका उपाध्यक्षा सुचिता कांबळे, महिला तालुका कार्याध्यक्षा मरिना रिबेलो, तालुका सहसचिव योगेश राऊत, बोईसर शहर सचिव शाहिद खान, वानगाव शहरध्यक्ष जिभाऊ अहिरे, चिंचणी शहराध्यक्ष किरन गोरखाना, कापसी महिला शाखाध्यक्षा सोनाली जाधव, नरफड शाखाध्यक्ष अजय पडवळे, महिला सहसचिव सफाळे विभाग जयवंती गुप्ता, लालठाने शाखाध्यक्ष प्रकाश कातारे,सफाळे शाखा सल्लागार सुदाम सर्जेराव व अनेक कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थित होते.