(पालघर प्रतिनिधी ) कांदिवली,मुंबई येथील केईएस श्रॉफ महाविद्यालयातील तर्फे राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी वसईतील टिवरी गावात 11मार्च ते 17मार्च 2022 रोजी आठवडाभर विविध प्रकारचे श्रमदान शिबिराचे आयोजन केले होते. व नवीन पिढीला असा एक चांगला आदर्श दिला. महाविद्यालयाने राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत टिवरीगाव दत्तक घेतले आहे. गावातील नागरिकांना आधुनिक तंत्रज्ञान शिकवणे, स्वच्छतेचे महत्त्व पटवून देणे, तसेच दुकानदारांना प्लास्टिक पिशवी ऐवजी पेपर पिशवी वापरावे, तसेच विद्यार्थ्यांनी वृक्षलागवड केले झाडे लावा झाडे जगवा असा संदेश पथनाट्याद्वारे विद्यार्थ्यांनी नागरिकांना माहिती दिली व जागरुक राहावे याशिवाय महाविद्यालयाने गावाला 5 संगणक भेट दिली, अत्याधुनिक IT LAB उभी केले आहे.राष्ट्रीय सेवा योजनेच्या श्रमदान कार्यक्रमाला मदत व सहयोग टिवरीगावाचे सरपंच सौ बाजारी नरेश ठक्कर, उप सरपंच नुतनकुमार सूर्यकांत भोईर ग्रामसेवक एम डी पाचांगणे यांची उपस्थिती लाभली. राष्ट्रीय सेवा योजनेला महाविद्यालयाचे मुख्य आयोजक प्राचार्या डॉ लिली भूषण,प्रोग्राम ऑफिसर जिग्ना व्यास,प्रोग्राम ऑफिसर डॉ रंजना यावगल , सहा. प्रोग्राम ऑफिसर मनोज सिंग, सहा.प्रोग्राम ऑफिसर डॉ संजय मिश्रा यांचे मार्गदर्शन लाभले व विशेष मेहनत घेतली. सर्व विद्यार्थ्यांना व शिक्षक यांनी प्राचार्या डॉ लिली भूषण यांचे आभार व्यक्त केले. केईएस महाविद्यालयाने एक वेगळा आदर्श समाजापुढे निर्माण केला. केवळ महाविद्यालयात शिक्षण हाच आमचा हेतू नसून मुलांचा सर्वांगीण विकास करून भावी पिढीसाठी एक सक्षम आणि चांगला विद्यार्थी किंवा माणूस घडवणे हेच आमचे ध्येय आहे असे केईएस महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ लिली भूषण यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले .