

वसई / प्रतिनिधी मीरा भाईंदर-वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या क्षेत्रात झपाट्याने वाढत असलेली लोकवस्ती त्यासाठी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस सज्ज आहेत. वाढते गुन्हे नियंत्रण आणण्यासाठी नेहमी सक्रिय असते,प्रत्येक नागरिकांची पोलीस ठाण्यात येणाऱ्या तक्रारीची दखल घ्यावी तसेच गुन्हा दडपू नये असे पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांनी मांडवी पोलीस ठाण्याच्या उदघाटन प्रसंगी पोलिसांना मार्गदर्शन करताना सांगितले. विरार मांडवी येथील पोलीस ठाण्याच्या उदघाटन प्रसंगी महासंचालक रजनीश शेठ , पोलीस आयुक्त सदानंद दाते , खासदार राजेंद्र गावित , आमदार राजेश पाटील , आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यासह लोकप्रतिनिधी व नागरिक उपस्थित होते. ते पुढे म्हणाले कि , महिला , बालक , जेष्ठ नागरिक तसेच वंचित शोषित घटकांच्या संरक्षणाची जबाबदारी पोलिसांची आहे.तसेच पोलिसांची आपल्या परिसरात अंमली पदार्थ , दारू जुगार वाळू अशा अवैद्य बाबींवर अंकुश असला पाहिजे.तसेच आमदार राजेश पाटील म्हणाले कि , ग्रामीण भागातील जनतेला तक्रारीसाठी विरार जावे लागायचे मात्र आता नव्या पोलीस ठाण्यामुळे नागरिकांना ह्याचा फायदा होईल.या पोलीस ठाण्यामुळे येथील राहिवाशी यांना सुरक्षा मिळेल —————————————