

दि.१७ राजेश जाधव-शेल्टर फाऊंडेशन च्या माध्यमातून आदिवासींचा विकास सुप्रसिद्ध अभिनेत्री तृप्ती भोईर यांच्या शेल्टर फाऊंडेशन या संस्थेच्या माध्यमातून पालघर जिल्ह्यातील आदिवासी कातकरी पाड्यांमध्ये बांबूपासून अनेक आकर्षक गृहपयोगी वस्तू बनविण्याचे प्रशिक्षण देऊन त्यातून रोजगार निर्मिती करण्यासाठी शेल्टर फाऊंडेशन च्या वतीने प्रयत्न सुरू असतो यातूनच आदिवासी लोकांचा विकास व्हावा हाच या संस्थेचा मुख्य उद्देश आहे.या संस्थेच्या अध्यक्ष शितल निकम व संस्थापक चित्रपट निर्माती, दिग्दर्शक अभिनेत्री तृप्ती भोईर या नेहमीच प्रसिध्दी पासून दूर राहून त्या आदिवासी लोकांच्या प्रगतीसाठी नेहमीच वेगवेगळे उपक्रम घेऊन निस्वार्थीपणे सामाजिक काम करत असतात.आज या प्रसिद्ध अभिनेत्री तृप्ती भोईर यांचा वाढदिवस त्यांनी पालघर जिल्ह्यातील ढेकाळे या गावी आदिवासी लोकांबरोबर अत्यंत साधेपणाने साजरा केला.त्यांना मैत्री संस्थेचे अध्यक्ष सूरज भोईर, सचिव राजेश जाधव यांनी बुध्दांची प्रतिमा भेट देऊन त्यांच अभिनंदन केलं आणि सामाजिक काम एकत्र करण्यासाठी आश्वासन दिले.