
दरवर्षी २१ मी रोजी दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिन साजरा केला जातो. परंतु या वर्षी शासन परिपत्रकानुसार हा दिवस २० मे या दिवशी साजरा करण्याचे आदेश होते. या आदेशाच्या अनुषंगाने जिल्हा परिषद पालघर येथे आज समिती सभागृहात प्रकल्प संचालक , जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा तुषार माळी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि) संघरत्ना खिल्लारे यांच्या प्रमुख उपस्थितीत दहशतवाद व हिंसाचार विराधी दिवसाची शपथ घेतली.
“आम्ही, भारताचे नागरिक, आपल्या देशाच्या अहिंसा व सहिष्णूतेच्या परंपरेविषयी दृढ निष्ठा बाळगून याद्वारे सर्व प्रकारच्या दहशतवादाचा व हिंसाचाराचा आमच्या सर्व शक्तीनिशी मुकाबला करण्याची गांभिर्यपूर्वक प्रतिज्ञा करत आहोत. आम्ही प्रतिज्ञा करतो की, आम्ही सर्व मानवजातीमध्ये शांती, सामाजिक एकोपा आणि सामंजस्य टिकवू व वर्धिष्णू करु, तसेच मानवी जिवीत मूल्ये धोक्यात आणणा-या विघटनकारी शक्तींचा प्रतिकार करु. “
अशी शपथ घेण्यात आली.
यावेळी जिल्हा परिषदमधील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.