
🔸पोलिस आयुक्त श्री.सदानंद दाते व वसई पोलिस निरीक्षक श्री. कल्याणजी कर्पे यांचे मानले आभार – रुबीना मुल्ला
🔸धोवली येथील सरकारी जागेवर बुलडोजर द्वारे गरिबांचे घरे तोडणारे भुमाफिया प्रवीण वर्तक व राजेश चौधरी यांच्यावर अखेर गुन्हा दाखल
🔸पालघर जिल्हाधिकारी यांची या प्रकरणावर नेमकी काय भूमिका ?
वसई (प्रतिनिधी) : वसई तालुक्यातील वसई गाव धोवली येथील जवळपास १५ वर्षांपासून असलेली घरे तोडून रहिवाशांना बेघर केल्या प्रकरणी दोन इसमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबतची अधिक माहिती अशी की, गाव मौजे धोवली सर्वे नंबर १०४ / अ येथील ३ एकर २० गुंठे शासकीय भूखंड अनिलकुमार वामन सावंत नामक इसमाला देण्यात आला असून त्याच्या नावे सात बारा घडविण्यात आला आहे. ही सर्व प्रक्रीया अत्यंत जलदगतीने पूर्ण करण्यात आली. मुळात शासकीय भूखंड अनिलकुमार वामन सावंत याला का देण्यात आला हा प्रश्न आहे.
या भूखंडावर २० झोपड्या होत्या. त्या २० झोपड्यांवर अनिलकुमार वामन सावंत याने त्याचे साथीदार प्रवीण वर्तक व राजेश चौधरी यांनी बुलडोजर फिरवून त्या झोपड्या तोडून टाकल्या. लोकांना धमक्या देऊन घरातून बाहेर काढून त्यांच्या घरावर बुलडोजर फिरविणे हा गंभीर गुन्हा आहे त्यामुळे वसई पोलिस स्टेशन मध्ये अनिल कुमार सावंत यांचे दोन्ही साथीदार वर वसई पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा नोंद केला आहे.
सदर ठिकाणी राहणारे रहिवासी ज्यांची घरे अनिलकुमार वामन सावंत व त्याचे साथीदार याने तोडून त्यांना बेघर केले आहे ते सर्व लोक गरीब असून त्यांना कोणी वाली नाही!
ज्या झोपड्या तोडण्यात आल्या त्या १५ वर्षे जुन्या होत्या. नियमानुसार १२ वर्षे वास्तव्य असेल तर त्या वास्तुवर कब्जाधारकाची मालकी होते. अनिलकुमार वामन सावंत याला ही गोष्ट माहीत आहे. त्यामुळे कायदेशीर मार्गाने सदर रहिवाशांना हटविणे अशक्य असल्यामुळे प्रवीण वर्तक, व राजेश चौधरी याने रहिवाशांना धमकावून त्यांना घरे खाली करायला लावून ती घरे तोडून टाकली.
घरे तोडल्या प्रकरणी कारवाई व्हावी म्हणून ७ तक्रारदारांनी तक्रार करून वसई पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर नोंदविण्याकरिता आग्रह करीत होते. मात्र पोलिसांनी प्रवीण वर्तक व राकेश चौधरी या दोघांवर भादंविसक ४४८, ४२६, ४२७, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. अनिलकुमार वामन सावंत याने गोरगरिबांच्या घरांवर बुलडोझर फिरविल्याचे वृत्त परिसरात पसरताच युवा शक्ती एक्सप्रेसच्या कार्यकारी संपादिका रुबिना मुल्ला यांनी घटनास्थळी जाऊन बेघर झालेल्या लोकांची भेट घेऊन त्यांना घेऊन त्या पोलीस स्टेशनमध्ये गेल्या. व तेथे गुन्हा दाखल केला. या कामात भारतीय जनता पक्षाचे वसई शहर मंडळ चिटणीस अमित पवार, आत्मनिर्भर भारत जिल्हा संयोजक तसनिफ़ शेख यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
सदर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक कल्याणराव करपे यांनी आपले कर्तव्य योग्य प्रकारे बजावून गुन्हा दाखल केला. तसेच या प्रकरणात पालघर जिलधिकारी आता अनिल कुमार सावंत चा सात बारा रद्द करतीला का? तसेच या प्रकरणात त्यांची भूमिका काय आहे ते आता जनतेला पाहायचे आहे