
नाशिक (दि. १९ मे २०२२) – राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांच्या नेतृत्वाखाली उपाध्यक्ष निलेश सानप यांच्यासह शिष्टमंडळाने पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांना सळई चोरी संदर्भात निवेदन देण्यात आले. तातडीने कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
दिंडोरी आणि सिन्नर येथील कंपन्यांमधून शेकडो ट्रेलर स्टील घेऊन नाशिक शहरांमधून मुंबईच्या दिशेने जात असतात ड्रायव्हरशी संगणमत करून अवैद्य धंदे करणारे व्यवसायिक एका ट्रेलर मधून सुमारे ५०० ते ७००किलो स्टील चोरी करतात.दिवसभरात सुमारे ४० ते ५० ट्रेलर मधून शेकडो किलो स्टीलची चोरी अंबड-सातपूर लिंक रोड भंगार बाजारातील खाडी परिसरात तसेच नाशिक रोड परिसरात हायवे रोड जवळ चिंतामणी हॉस्पिटल समोर नवीन झालेल्या सीएनजी पंपालगत अशा या दोन ठिकाणी नाशिक शहरात सळईचोरीचे अवैद्य धंदे मोठ्या प्रमाणात होऊन लाखो रुपयांच्या मालाची चोरी दिवसाढवळ्या होत आहे.
या अवैद्य धंदे चालकांचे सळईसाठी आपापसात भांडणे होऊन परिसरामध्ये दहशत माजविण्याचा प्रयत्न होत आहे तसेच परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.या अशा अवैद्य धंद्यामुळे नाशिक औद्योगिक वसाहतीची बदनामी होऊन उद्योजकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.या परिसरातील नागरिकांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष निलेश सानप यांना याबाबतची माहिती दिली.
माहिती मिळताच निलेश सानप यांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नाशिक शहराध्यक्ष अंबादास खैरे यांच्या निदर्शनास हि बाब आणुन दिली.राष्ट्रवादी युवक कॉग्रेस शहराध्यक्ष अंबादास खैरे यांच्या मार्गदर्शनाखालील शिष्ठमंडळातील निलेश सानप,संतोष भुजबळ,डॉ.संदिप चव्हाण,सागर बेदरकर व आकाश कासार यांनी नाशिक शहर पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांना भेटुन सळईचोरांवर लवकरात लवकर कारवाई व्हावी अन्यथा राष्ट्रवादी युवक कॉग्रेस तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडणार व याची सर्व जबाबदारी पोलिस प्रशासनाची असेल याबाबतचे निवेदन दिले.