
प्रतिनिधी :
अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांकरिता महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाने पालघर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मार्च पासून वेतन मिळालेले नसून या कर्मचाऱ्यांचे या व्यतिरिक्त काही प्रश्न आहेत. महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाने पालघर जिल्हाधिकारी कार्यालयास दिलेल्या निवेदनात
एकूण १४ मागण्या केलेल्या असून सदर मागण्या मान्य न केल्यास दि. २४ .५. २०२२ पासून अंगणवाडी कर्मचारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलनास बसतील, असा इशारा महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाने दिला आहे. अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाने वारंवार जिल्हाधिकारी कार्यालयाला निवेदने दिली आहेत. मात्र अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे प्रशासन लक्ष देत नसल्यामुळे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाने अखेर बेमुदत धरणे आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.