🔸नव्याने बांधकाम ठेका घेणाऱ्या ठेकेदारांची मक्तेदारी मोडीत
महानगरपालिकेचे आयुक्त अनिल कुमार पवार यांनी अवैध बांधकामांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्या आदेशानुसार प्रभाग समिती चे सहाय्यक आयुक्त अवैध बांधकामावर कारवाई करत आहेत परंतु याला काही मुजोर बांधकाम ठेकेदार दाद देत नाही. ते नव्याने बांधकाम व्यवसायात आलेल्या बांधकाम साहित्य पुरवठादार च्या नादाला लागून अवैध बांधकाम बांधत आहेत . वाकण पाडा चौधरी कंपाऊंड येथे तीन हजार चौरस फुटांचे बांधकाम सुरू असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त आशिष पाटील यांना मिळाली होती त्याचबरोबर महाराष्ट्र वृत्तपत्र संघटनेच्या पदाधिकारी व सभासदांनी मिळून या संदर्भात अतिरिक्त आयुक्त आशिष पाटील यांची भेट घेऊन सदरचे अवैध बांधकाम तोडण्याची तक्रार केली होती त्यावेळेस अतिरिक्त आयुक्त आशिष पाटील यांनी सदर बांधकाम तोडण्याचा शब्द दिला होता त्या अनुषंगाने सदरचे बांधकाम तोडण्याचे आदेश संबधित अधिकाऱ्यांना दिले होते त्यानुसार प्रभाग समिती फ च्या प्रभारी सहाय्यक आयुक्त रूपाली संखे यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना घेऊन चौधरी कंपाऊंड येथील तीन हजार चौरस फुटांचे अवैध बांधकामावर बुलडोझर फिरवला. त्यामुळे मी ज्या बांधकामाची सेटिंग घेतो ते बांधकाम कधीच सुटत नाही अशा अविर्भावात असणाऱ्या नव्या बांधकाम ठेकेदार यांची भागीदारी आता संपुष्टात आल्याचे बोलले जात आहे या कारवाईचे महाराष्ट्र वृत्तपत्र संघटनेमार्फत स्वागत करण्यात आले आहे अशाप्रकारे कारवाई सुरू ठेवावी व अनधिकृत बांधकाम करणार्यांचे कंबरडे मोडीत काढावे अशीही मागणी करण्यात येत आहे