
वसई विरार शहर महानगर पालिका हद्दीतील दैनंदिन आणि आठवडा बाजारात निश्चित केलेल्या दरापेक्षा अधिक रक्कम फेरीवाल्यांकडून वसूल करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करण्यात यावी तसेच दैनंदिन व आठवडा बाजारात कर वसुली दर चे फलक पंधरा दिवसात न लावल्यास आमरण उपोषण करणार… देविदास जयवंत केंगार
11/11/2020 रोजी सुद्धा अपंग जनशक्ती संस्थेच्या एका निवेदनाद्वारे आयुक्त यांना कळविण्यात आले होते. परंतु अद्याप पर्यंत बाजार कर वसुली करणाऱ्या ठेकेदारांवर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही तसेच दैनंदिन आणि आठवडा बाजारात बाजार कर वसुलीचे दर फलक लावण्यात आलेले नाही. आपल्या वसई तालुक्यातील वसई विरार शहर महानगरपालिका हद्दीत प्रत्येक प्रभागात आठवडा व दैनंदिन बाजार भरले जातात. त्या बाजारात अनेक व्यावसायिक व्यवसाय करण्यासाठी येत असतात. अपंग व्यक्ती, स्थानिक नागरिक तसेच आदिवासी नागरिक आणि आपल्या शेतातील भाजीपाला व अन्य वस्तू विकण्यासाठी येणारे शेतकरी बंधू-भगिनी येत असत. वसई विरार शहर महानगर पालिकेने प्रत्येक प्रभागातील आठवडा व दैनंदिन बाजार कर वसुली करण्यासाठी दर वर्षी निविदा काढण्यात येत असतात. बाजार कर वसुली करण्यासाठी ज्या ठेकेदाराला ठेका देण्यात आला आहे. त्या ठेकेदाराला ज्या बाजार कर वसुलीचा ठेका मिळाला आहे. त्या बाजारात महानगरपालिकेने प्रत्येक फेरीवाल्यांसाठी बाजार कर ची रक्कम ठरवून दिली आहे व त्या कराच्या रक्कमेचा फलक त्या बाजारात लावण्यासाठी बंधनकारक असूनही कोणत्याही ठेकेदारांकडून असे फलक लावण्यात आलेले दिसून येत नाही व निश्चित ठरलेल्या रकमेपेक्षा अधिक रक्कम ठेकेदार फेरीवाल्यांकडून वसूल करत आहे.अशा ठेकेदारांवर कायदेशीर कारवाई करून त्या ठेकेदाराला येत्या पंधरा दिवसात काळा यादीत न टाकल्यास तसेच प्रत्येक भागातील बाजार करवसुलीचे दर प्रत्येक बाजारात तसेच मुख्य रस्त्यालगत फलक न लावल्यास येत्या पंधरा दिवसात आपल्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यास येईल याची सर्व जबाबदारी आपलीच राहील. लवकरात लवकर वसई विरार शहर महानगरपालिकेतील प्रत्येक प्रभागात आठवडा व दैनंदिन बाजार कर वसुलीचे फलक लावण्यात यावे तसेच फेरीवाल्यांकडून निश्चित केलेल्या रकमेपेक्षा अधिक रक्कम घेणाऱ्या ठेकेदारांवर कायदेशीर कारवाई करून त्यांना काळ्या यादीत टाकण्यात यावे. अन्यथा आमरण उपोषण करण्याचे इशारा अपंग जनशक्ती संस्थेचे अध्यक्ष देविदास जयवंत केंगार यांनी आयुक्तांना एका पत्राद्वारे कळविले आहे