
तत्कालीन मंडळ अधिकारी श्री. डि. एन. जाधव आणि तलाठी श्री. हेमंत मुलाणे यांचा भ्रष्ट कारभार चव्हाट्यावर
सामाजिक कार्यकर्ते अजित दत्तात्रेय वर्तक यांची थेट महसूल मंत्र्यांना तक्रार
गाव मौजे बोळिंज सर्वे नंबर २११/२/६, १/१, २२५/८, २२५/५ या जमिनीवर तब्बल ३२३२ ब्रास अवैध मातीचा भराव करणाऱ्या मेसर्स मेफेअर हाउसिंगचे भागीदार श्री नयन ए. शहा यांच्या विरोधात आगाशी येथील सामाजिक कार्यकर्ते श्री अजित दत्तात्रय वर्तक यांनी महाराष्ट्राचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना रितसर लेखी तक्रार दिली होती.
सदरचा मातीभराव करण्यासाठी आवश्यक असलेली गौण खनिजाची सक्षम प्राधिकाऱ्याकडून करून घेतलेली परवानगी, स्वामित्वधन भरल्याची चलने निर्गत पास इत्यादी कोणतेही आवश्यक दस्तऐवजांची पूर्तता संबंधित विकासक यांनी न करता नमूद जागेवरती अवैध माती भराव केलेला होता.
सदर बाब सामाजिक कार्यकर्ते अजित दत्तात्रय वर्तक यांनी तत्कालीन मंडळ अधिकारी श्री. डि. एन. जाधव आणि तलाठी श्री. हेमंत मुलाणे यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर दिनांक ०४.०२.२०२० रोजी त्यांनी जागेवरती येऊन पंचांच्या समक्ष अवैध माती भरावाचे मोजमाप करून पंचनामा तयार केला होता.
मात्र सदर मोजमाप करतेवेळी तत्कालीन मंडळ अधिकारी श्री. डि. एन. जाधव आणि तलाठी श्री. हेमंत मुलाणे यांनी संपूर्ण ३२३२ ब्रास मातीभरावचे मोजमाप न करता संबंधित विकासक मेसर्स मेफेअर हाउसिंगचे भागीदार श्री. नयन ए. शहा व श्रीमती वसुमती ए. शहा यांच्याशी संगनमत करून जाणीवपूर्वक मातीभरावचे मोजमाप १३९९ ब्रास इतके कमी दाखवले.
मात्र २४ डिसेंबर२०१९ ते ३१ जानेवारी २०२० या कालावधीत मेसर्स मेफेअर हाउसिंगच्या बांधकाम साईटवरील वाहनांच्या आवक-जावक रजिस्टर मधील नोंदीवरून एस. बी. इंटरप्रायजेस खर्डी यांनी आयवा डंपर वाहन क्रमांक MH 48 AY 8237, MH 48 AY 8241, MH 48 AY 8614, MH 48 AY 6464, MH 48 EY 8380, MH 48 AY 4903, या क्रमांकाच्या वाहनातून प्रत्येकी ०६ ब्रास आणि लहान डंपर वाहन क्रमांक MH 04 DK 5058, MH 48 T 6878, MH 04 FD 1545, MH 04 FP 9945 या क्रमांकाच्या वाहनातून प्रत्येकी ०४ ब्रास प्रमाणे एकूण ३२३२ ब्रास विना रॉयल्टी मातीचा पुरवठा केल्याचे स्पष्ट दिसून आले.
असे असताना तत्कालीन मंडळ अधिकारी श्री. डि. एन. जाधव आणि तलाठी श्री. हेमंत मुलाणे यांनी संपूर्ण ३२३२ ब्रास मातीभरावचे मोजमाप न करता संबंधित विकासक मेसर्स मेफेअर हाउसिंगचे भागीदार श्री. नयन ए. शहा व श्रीमती वसुमती ए. शहा यांच्याशी संगनमत करून स्वतःचा आर्थिक फायदा साध्य करण्याच्या हेतूने जाणीवपूर्वक नमूद जागेवर झालेल्या अवैध मातीभरावचे मोजमाप १३९९ ब्रास इतके कमी दाखवले आणि तसे खोटे पंचनामे तयार करून तहसीलदार वसई यांना सादर करून शासनाची दिशाभूल केली.
त्यामुळे आगाशी येथील सामाजिक कार्यकर्ते श्री अजित दत्तात्रय वर्तक यांनी शासनाची दिशाभूल करणाऱ्या व शासनाचा महसूल बुडवून फसवणूक करणाऱ्या तत्कालीन मंडळ अधिकारी आगाशी श्री. डि. एन. जाधव, तलाठी सजा बोळींज तलाठी श्री. हेमंत मुलाणे यांच्यावर महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) अधिनियम १९७९ अन्वये निलंबनाची कारवाई करण्याची लेखी मागणी महसूलमंत्र्यांकडे केली होती.
तसेच मेसर्स मेफेअर हाउसिंगचे भागीदार श्री नयन ए. शहा व श्रीमती वसुमती ए. शहा यांच्यावर अवैध माती भराव प्रकरणी दंडात्मक कारवाईची मागणी करण्यात आलेली होती.
याबाबत अजित वर्तक यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने महसूल मंत्र्यांनी आदेश दिल्यानंतर वसई तहसीलदार श्रीमती उज्वला भगत यांनी मंडळ अधिकाऱ्यांना निर्देश देऊन तब्बल 3232 ब्रास अधिकृत माती भरावाची नोटीस हाउसिंग चे भागीदार श्री नयान शहा यांना बजावलेली आहे.
महसूल मंत्र्यांच्या आदेशानंतर अवैध माती भराव प्रकरण श्री नयन शहा यांच्या अंगाशी येण्याची चिन्हे दिसत असून तब्बल 62 लाख रुपये इतक्या गौणखनिज दंडाचा भरणा त्यांना शासनाला करावा लागणार असल्याची चिन्हे दिसत आहेत.