युग हा ७ वर्षाचा मुलगा व वि श महापालिकेच्या तरण तलावात पोहण्यासाठी गेला असता त्याचा तेथे बुडून दुर्देवी मृत्यू झाला.सर्व प्रसारमाध्यमांनी संवेदनशील असलेला हा मुद्धा मोठी प्रसिद्धी देऊन उचलून धरला.
परंतु आजरोजी या घटनेला ३ महिने उलटून गेले तरी संबंधीत लाडवा कुटुंबाला न्याय मिळालेला नाही.ना महापालिका प्रशासनातील कोणी ना सत्ताधाऱ्यातील कोणी लोकप्रतिनिधी या कोणीही आजतागायत या कुटुंबाला भेटून त्यांचे सांत्वन करावयास किंवा त्यांना धीर देण्यासाठी पोहचलेल नाही.हि अत्यंत खेदाची व दुर्देवाची बाब आहे.

तरण तलावात सी सी टीव्ही नसणे, अपघात झाल्यास योग्य औषधउपचाराची व्यवस्था नसणे, तसेच अन्य बंधनकारक व्यवस्था नसणे ई ह्या अत्यन्त गँभिर बाबी आहेत.अपघात झाल्यास सबंधितास नुकसानभरपाई देणेची तरतूद ठेकेदारांच्या करारनाम्यात नाही.यासाठी महापालिका प्रशासन जबाबदार आहे पण त्याच बरोबर करदात्यांच्या भल्याचा विचार करणारे लोकप्रतिनिधी नगरसेवक हि तितकेच जबाबदार आहेत.त्यांच्यावरही उचित कारवाई होणे आवश्यक आहे. पोलीस प्रशासनाने नेहमी प्रमाणे थाथुर मातूर कारवाई केलेली असल्याचे वसईकर जनतेचे म्हणणे आहे.

गुरुवार दिनांक ११ जुलै रोजी युग चा जन्मदिवस आहे.त्या दिवशी त्याला श्रद्धांजली वाहण्यासाठी व त्याच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी महापालिका तरण तलाव आंबाडी रोड येथे सायंकाळी ठीक ६.३० वाजता मेणबत्या प्रज्वलीत करण्याचा कार्यक्रम आयोजित केला आहे.कार्यक्रमा नंतर तेथून जनतेच्या सहभागासह कॅडल मार्च निघून तो आंबाडी रोड स्कायवॉक येथे त्याचा समारोप होईल.,यातून युग व त्याच्या कुटुंबियांना योग्य न्याय मिळावा तसेच प्रशासनात संवेदनशीलता वाढावी व संबंधितावर उचित कारवाई व्हावी यासाठी वसईकर जागृत आहेत असा संदेश देण्याचा प्रयत्न आहे.
या कार्यक्रमात तमाम वसईकर जनतेसह सर्व राजकीय पक्ष व संघटना यांनी सहभागी व्हावे अशी विनंती करण्यात येत आहे :- .मी वसईकर अभियान

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *