

वसई: भाजपा सरकारला 8 वर्ष पूर्ण झाल्याचे औचित्य साधून भाजपा वसई-विरार जिल्हा महासचिव उत्तम कुमार यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली वसई रेल्वे स्टेशनवरील हमाल वर्गासोबत ‘चाय पे चर्चा’ चा कार्यक्रम राबविण्यात आला. भाजपा केंद्रात यशस्वी 8 वर्ष पूर्ण केल्याप्रकरणी ‘सेवा सुशासन आणि गरीब कल्याण’ असा पंधरवडा साजरा करण्याचे भाजपा महाराष्ट्र प्रदेश कडून सांगण्यात आले आहे त्याच पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम करण्यात आला. यावेळी हमाल वर्गास केंद्र सरकारने मागील आठ वर्षात घेतलेले धाडसी निर्णय तसेच गरिबांसाठी विविध योजनांच्या माध्यमातून केलेली मदत व कोरोनाकाळात समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवलेली लसीकरण मोहीम आदी माहिती उत्तम कुमार यांनी हमाल वर्गास सांगितली.
उत्तम कुमार यांनी यावेळी बोलताना पुढील पंधरा दिवस असेच विविध छोटेखानी कार्यक्रम आम्ही घेणार असून रविवार 15 जून रोजी वसई तालुक्यातील सर्व आशा सेविकांचा सन्मान करण्याचा आमचा मानस आहे असे यावेळी त्यांनी सांगितले.
कार्यक्रमास वसई रोड मंडळाचे अध्यक्ष रामानुजम, संजय आचिपलिया, मार्कंडेय पांडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.