
राजेश जाधव – युसूफ मेहेर अली सेंटर पनवेल आणि मैत्री संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आज पर्यावरण दिनानिमित्त युसूफ मेहेर अली सेंटरला ६० वर्षे झाली म्हणून ६० झाडे लावण्यात आली.या वेळी उपस्थित मान्यवरांनी पर्यावरणातील होणारे बदल याबद्दल चिंता व्यक्त केली.आणि पर्यावरण वाचवा जीवन जगवा हा संदेश देत सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन समाजात पर्यावरण विषयी प्रबोधन करुन तसेच सामाजिक उपक्रम राबवून जागृती करण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.या कार्यक्रमाला ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी समाजवादी डॉ.जी.जी.पारिख , युसूफ मेहेर अली सेंटरच्या सचिव विजयाताई चौहान, ट्रस्टी नितीन आणेराव, कामगार नेते पत्रकार अभिजित राणे, सामाजिक कार्यकर्ता माई सावर्डेकर, मैत्री संस्थेचे अध्यक्ष सूरज भोईर, सचिव राजेश जाधव, पदाधिकारी विजय गोडबोले, किरण म्हात्रे, तेजस्विनी डोहाळे, शितल पाटील,तेहसिन चिंचोलकर, संतोष भोईर, तसेच वूमन वेल्फेअर फोरमच्या अध्यक्षा कल्पना शिंदे, दिलीप गाडेकर, संकल्प संस्थेचे अध्यक्ष विनोद हिवाळे हे उपस्थित होते.या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देविदास पाटील यांनी केले.