
आत्ता दैनंदिन कामाची नोंद करावी लागणार हालचाल नोंदवहीत….
वसई विरार शहर महानगर पालिका स्थापित झाल्यापासून आजतागायत चार अधिकारी यांनी आयुक्त पद भूषवले होते . परंतु सद्यस्थितीत कोरोनाच्या काळात निवडणूक मागील दोन वर्षांपासून होत नसल्याने तत्कालीन आयुक्त गंगाधरन डी आणि अनिलकुमार पवार हे आयुक्त तथा प्रशासकीय अधिकारी असा पदभार सांभाळत आहेत, परंतु अधिकरी व कर्मचारी वर्गावरती अंकुश ठेवण्यास सर्वच आयुक्त अपयशी ठरले आहेत कारण अधिकारीवर्ग व कर्मचारीवर्ग मनमानी धोरणाचा अवलंब करून सामान्य नागरिकांना वेठीस धरण्याचे काम चोख पार पाडत असल्याचे निदर्शनास आले होते असे महेश कदम यांनी म्हटले आहे.
पालिकेच्या नऊ प्रभाग समिती निहाय विभागीय कार्यालयासह एक मुख्यालय मिळून १० कार्यालय आहेत परंतु महेश कदम हे स्वतः १० कार्यालय फिरल्यानंतर अनेक ठिकाणी साहेब बाहेर आहेत, मिटींग,मंत्रालय, विभागीय दौरा,आताच गेले इत्यादी अशी अनेक कारणे सतत सांगितली जात होती तर अनेक नागरिक विविध कामासाठी कार्यालयात येऊन तासनतास वाट पाहत बसायचे, परंतु निश्चित कारण नागरिकांना काहीही कळु शकत नव्हते,त्यामुळे सर्वच नागरिकहे निराश होऊन निघून जायचे . सतत नागरिकांचीही होणारी फरफट लक्षात येताच भारतीय जनता पार्टीचे विरार शहर उपाध्यक्ष-महेश कदम यांनी आस्थपना विभागास निवेदन देऊन हालचाल नोंदवही अनिवार्य करावी अशी मागणी केली होती त्यानुसार वसई विरार शहर महानगर पालिकेचे आस्थापना विभागाचे उपायुक्त-दीपक कुरळेकर यांनी दिनांक:-०२/०६ २०२२ रोजी सर्वच प्रभाग समिती सहाय्यक आयुक्त, प्रभारी सहाय्यक आयुक्त तथा सर्व विभागप्रमुखांना आदेश देण्यात आले की ,प्रत्येकांनी आपापल्या प्रभागातील प्रत्येक विभागासाठी हालचाल नोंदवही तयार करावयाची व कार्यालयीन कामकाजासाठी कार्यालयाबाहेर जावयाचे झाल्यास किंवा सभेसाठी मूख्यालय किंवा इतर मंत्रालयात जावयाचे झाल्यास प्रत्येक अधिकारी / कर्मचारी यांनी कार्यालयाबाहेर जाताना हालचाल नोंदवही मध्ये नोंद करुन कार्यालय सोडावयाचे आहे , जेणेकरुन कार्यालयात कामकाजासाठी भेटावयास येणा – या नागरीकांना उशिरा पर्यंत वाट बघावी लागणार नाही . कार्यालयीन हजेरी पत्रकावर हजर असलेबाबत स्वाक्षरी असली तरी जर संबंधित एखादा कर्मचारी कार्यालयात हजर नसेल आणि हालचाल नोंदवही मध्ये बाहेर गेल्याची नोंद नसेल तर सदर दिवसाची गैरहजेरी धरुन सदर दिवस विनावेतन करण्यांत येईल , याची नोंद घ्यावी .असे कार्यालयीन आदेश पारित केले आहेत, त्यामुळे नक्कीच पालिका प्रशासनावर अंकुश राहणार असे महेश अंबाजी कदम यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.