

वसई पूर्व येथील तारकेनगर या गावातील आंगणवाडीची वरचे स्लॅब दुरुस्त करण्याची मागणी अपंग जनशक्ती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा डीसएबल हेल्पलाईन फाऊंडेशन(भारत) चे पालघर जिल्हाध्यक्ष देविदास जयवंत केंगार यांनी पालघर जिल्हा परिषद चे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि वसई विरार महानगरपालिकेचे आयुक्त यांना आपले सरकार या पोर्टल वर केली आहे. वसई पूर्व येथील तारकेनगर या गावातील आंगणवाडीत जवळजवळ 35-40 विद्यार्थी शिकत आहेत.ह्या आंगणवाडीचे वरचे स्लॅब गेल्या अनेक महिन्यांपासून अतिशय मोडकळीस आलेले आहेत.ह्या स्लॅब चे सळई पूर्ण निघत आलेले आहेत.पावसामुळे हे स्लॅब कधी ही खाली पडू शकते.ह्यामुळे या आंगणवाडीतील लहान मुलांना तसेच येथील शिक्षकांना ईजा व दुखापत होऊ शकते.ह्या तुटलेल्या स्लॅब मुळे येथील लहान मुलांना विद्यार्थ्यांना बाहेर बसवून शिक्षकांना शिकवावे लागते.हे स्लॅब लवकरात लवकर दुरुस्त करण्यात यावे अशी मागणी अपंग जनशक्ती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा डीसएबल हेल्पलाईन फाऊंडेशन(भारत) चे पालघर जिल्हाध्यक्ष देविदास जयवंत केंगार यांनी आपले सरकार पोर्टल वरून पालघर जिल्हा परिषद चे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि वसई विरार महानगरपालिकेचे आयुक्त यांना तक्रार केली आहे.