नवनिर्माण ऑटोरिक्षा,टॅक्सी, टेंपो चालक मालक संघटनेने परिवहन आयुक्त यांच्याकडे ऑटो रिक्षात बसवलेल्या सीएनजी किटचे हाड्रोटेस्ट प्रती तीन वर्षांनी करण्यात येत असून त्याकरीता शासकीय शुल्क आकरणी करून वाहन प्रणालीत त्याची वैधता नोंद केली जात असते, वास्तविक शुल्क आकरणी होत असल्याने संबंधित कार्यालयातील अधिकाऱ्यांनी हाड्रोटेस्ट वैधता प्रमाण पत्र जारी करणे आवश्यक असावे कारण असे केल्याने अनेक बोगस सीएनजी किट लावलेल्या ऑटोरिक्षा मिळू शकतील व त्यावर परिवहन विभागा कडून सहज कारवाई करता येईल,असे संघटनेचे संस्थापक, अध्यक्ष महेश कदम यांनी निवेदनात म्हटले आहे.
सद्यस्थितीत अनेक ऑटो रिक्षात बसवलेल्या सीएनजी किटचे हाड्रोटेस्ट वैधता वाहन प्रणालीत फक्त कार्यालयातच दिसत आहे, ते वाहन अँप मध्ये जसे वाहनाची नोंदणी दिनांक, विमा, पासिंग, परवाना, पियुसी वैधता दिनांक दिसतात त्याच प्रमाणे हाड्रोटेस्ट वैधता दिनांक समाविष्ट करून दिसली पाहिजे जेनेकरून सहज वाहनधारकांना व सामान्य नागरिकांना वैधता तपासणी करता येईल, व ऑटो रिक्षा धारकास योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरण तपासणी अगोदरच सीएनजी किटची हाड्रोटेस्ट सहज करता येईल, व नंतर योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरण तपासणीस अडचणी निर्माण होणार नाहीत,त्यामुळे ऑटो रिक्षात बसवलेल्या सीएननजी किट चे हाड्रोटेस्ट वैधता प्रमाणपत्र योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण प्रमाण पत्रा प्रमाणेच जारी करावे व वाहन प्रणालीत समाविष्ट करून वाहन ऍप वरती ही त्याची वैधता दिसून येणे उचित आहे,याची अंमलबजावणी तात्काळ करण्यात यावी असे निवेदन महेश कदम यांनी महाराष्ट्र राज्याचे परिवहन आयुक्त श्री. अविनाश ढाकणे साहेब याना दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *