नाहरकत दाखला व गौणखनिज परवण्याशिवाय उत्खनन केल्याचा ठपका

रस्ते बांधकाम करण्यासाठी महाराष्ट्रात अग्रस्थानी असलेल्या विक्रमगड येथील जिजाऊ कन्स्ट्रक्शन कंपनीला एक अब्ज दंडाची नोटीस पाठवण्यात आले आहे. जिजाऊ कन्स्ट्रक्शन कंपनीने वाडा तालुक्यातील कुमदल ( रायसळ) गावात बेकायदा उत्खनन केल्याचे निदर्शनास आल्यानंतर वाड्याचे तहसीलदार डॉ.उद्धव जाधव यांनी जिजाऊला १ अब्ज ५ कोटी २६ लाख १७ हजार ५० रुपयांच्या दंडाची आकारणी करून नोटीस पाठवली आहे. सात दिवसात जिजाऊमार्फत म्हणणे सादर न केल्यास हा दंड वसूल केला जाणार आहे.

जिजाऊचे निलेश सांबरे यांची कुमदल (रायसळ) गावात गट नंबर ४३/२ व ४३/५ येथे दगडांची खदान आहे. येथे उत्खनन सुरू असताना अधिकाऱ्यांनी पाहणी केली असता पर्यावरण नाहरकत दाखला व कोणतीही गौणखनिज उत्खनन परवानगी नव्हती. त्यांना नाहरकत शिवाय परवानगी देऊ नये असेही आदेश आहेत. तरीही येथे उत्खनन सुरू होत.यावर आलेल्या तक्रारीनुसार मंडळ अधिकारी कंचाड यांनी पाहणी करून पंचनामा केला. दिड महिन्यांपासून या कंपनीने बेकायदा गौणखनिज उत्खनन केल्याचा ठपका ठेवत कंपनीने १ लाख ३७ हजार ५९७ ब्रास दगडाचे उत्खनन केल्यामुळे कंपनी विरोधात तब्बल १ अब्ज ५ कोटी २६ लाख १७ हजार ५० रुपयांच्या दंडाची कारवाई करण्यात येईल अशी नोटीस त्यांना पाठवण्यात आले आहे. या नोटीसीचे उत्तर देण्यासाठी कंपनीला सात दिवसांची मुदत वाडा तहसीलदार यांनी दिली आहे. याकाळात कागदपत्रे देण्यात कसूर केल्यास दंड वसूल केला जाऊन कारवाई केली जाईल असे तहसीलदार कार्यालयाने नोटिशीत म्हटले आहे.


1) जिजाऊ कन्स्ट्रक्शन कंपनीच्या खदानीत प्रत्यक्ष पाहणी केली असता कंपनीने अवैध उत्खनन केल्याचे प्रथम दर्शनी दिसत आहे. दंडात्मक नोटीस बजावली आहे – डॉ.उद्धव कदम, वाडा तहसीलदार

2) जिजाऊ कन्स्ट्रक्शनचीएकही गाडी विनापरवाना बाहेर निघत नसून इतक्या मोठया प्रमाणात गौण खनिज बुडविण्याचा काही प्रश्नच निर्माण होत नाही. ही दंडाची नोटीस एकतर्फी असून आम्ही लवकरच सर्व रॉयल्टी तहसीलदारांकडे जमा करणार आहे – निलेश सांबरे,प्रोप्रायटर, जिजाऊ कन्स्ट्रक्शन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *