

वाडा, तलासरी, विक्रमगड तालुक्यातील गटविकास अधिकारी आणि वसई सभापती यांना आज जिल्हा परिषदे मार्फत नवीन गाड्यांचे वाटप करण्यात आले. जिल्हा परिषद अध्यक्ष वैदेही वाढाण, उपाध्यक्ष तथा शिक्षण व आरोग्य समिती सभापती ज्ञानेश्वर सांबरे,मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा परिषद सदस्य संदेश ढोणे,गणेश कासट,शैलेश करमोडा, यांच्या हस्ते लाल फित कापून अति.मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, प्रकल्प संचालक तुषार माळी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि) पं.स.सदस्य दिलीप वडे यांच्या प्रमुख उपस्थितीत गाड्यांचे उदघाटन करण्यात आले. यावेळी उपाध्यक्ष ज्ञानेश्वर सांबरे यांनी स्वतः गाडी चालवून नवीन वाहनांचा शुभारंभ केला.
सदर तीन पंचायत समित्या व वसई सभापती यांच्या गाड्या या जुन्या व वापरण्याच्या स्थितीत नव्हत्या.त्यामुळे मा.विभागीय आयुक्त कोकण भवन यांनी नवीन गाड्या खरेदी करण्याची मान्यता दिल्यानुसार जुन्या गाड्यांचे निर्लेखन करून नवीन गाड्या खरेदी केल्या.व आज उद्घाटन करून संबंधित गट विकास अधिकारी व सभापती यांच्या ताब्यात वापरासाठी दिल्या.