शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मधील घेण्यात आलेल्या इ.१० वी (माध्यमिक) परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून सदर परीक्षेस पालघर जिल्ह्यातील ३१०८३ मुले व २७२५४ मुली असे एकूण ५८३३७ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी २९९६१ मुले आणि २६७२८ मुली असे एकूण ५६६८९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे शेकडा प्रमाण मुले ९६.३९ % व मुली ९८.०७ % असे एकूण ९७.१७ % आहे.

सर्व विद्यार्थ्यांचे व मुख्याध्यापकांचे व पालकांचे अध्यक्ष, जि. प. पालघर, उपाध्यक्ष, जि. प. पालघर, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प.पालघर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प.पालघर. व शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जिल्हा परिषद पालघर यांनी अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *