
वसई तालुक्यातील जिल्हा परिषद क्वारी उर्दू माध्यमिक शाळा विरार ने सलग तिसऱ्या वर्षी 100% रिझल्ट ची हायड्रीक साधली आहे. SSC 2022 मध्ये झालेल्या परीक्षेत क्वारी उर्दू शाळेचे सर्व चे सर्व विद्यार्थी पास झाले आहेत. त्यापैकी तीन विद्यार्थ्यांना 80% पेक्षा जास्त मार्क्स ,10 विद्यार्थ्यांना 70% पेक्षा जास्त मार्क्स ,12 विद्यार्थ्यांना 60 टक्के पेक्षा जास्त मार्क्स मिळाले आहेत.
कु.सलमा खान या विद्यार्थ्यांने 84 टक्के मार्क्स मिळून प्रथम क्रमांक, कु.शमा खान 82% द्वितीय क्रमांक,कु. सबा शेख 81.40%मिळवून तृतीय क्रमांक मिळवला.या यशाबद्दल सर्व होतकरू विद्यार्थ्यांचे, विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर घरी लक्ष देणारे पालकांचे अभिनंदन व शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक श्री. झाकीर सर, श्री.अन्वर सर, श्री. सोपान सर , सौ. सना पिरजादे मॅडम यांनी कोरोना काळात सर्व शासकीय नियम नियमांचे पालन करून विद्यार्थ्यांची तयारी करून घेतली. तसेच शाळेच्या शिक्षकांनी रविवारी सुद्धा एक्स्ट्रा क्लास घेऊन विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण केला.त्यामुळे सर्वच स्तरातून शिक्षकांचेही कौतुक होत आहे .तसेच माननीय रहमान बलोच सर (माजी शिक्षण सभापती वसई विरार महानगरपालिका) यांनी वेळोवेळी दहावीच्या मुलांना मार्गदर्शन केले ते मोलाचे ठरले.

