
प्
विलगीकरण कक्ष, विवा कॉलेज शिरगाव येथिल २५०० बेड, कॉट गेल्या कुठे?
सलग ९ वर्षे एकाच ठिकाणी ठेवण्यात वरदहस्त कोणाचा?
फटाफट बिले पास होण्यामागे अर्थपूर्ण संबध कोणाचा?
ईतर विलगीकरण कक्षामध्ये सामान गेलं असल्याची शक्यता आहे, चौकशी झाल्यावर यावर भाष्य करू शकेल.- डॉ. भक्ती चौधरी (आरोग्य अधिकारी)
विरार : वसई विरार शहर मनपा मध्ये घोटाळ्याची कधी कमी नसते. जसे उंदिर घुशी पोकरतात तशी परिस्थिती या महापालिकेत आहे. वैद्यकीय आरोग्य विभागात गेली ९ वर्षें ठाण मारून बसलेल्या फार्मसिस्ट श्री.जितेंद्र पाटील यांच्या मनमानी कारभाराला आळा घालण्यासाठी व कोरोना विलगीकरण कक्ष, विवा कॉलेज शिरगाव येथिल बेड, कॉट गायब झल्या प्रकरणी तात्काळ चौकशी करून कायदेशीर अशी तक्रार आयुक्त अनिल पवार यांना स्वराज्य मावळा प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेच्या विनायक खर्डे यांनी दिली आहे.
उपर विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार मुख्य कार्यालयातील वैद्यकीय आरोग्य विभागात फार्मासिस्ट म्हणून काम करणारे श्री जितेंद्र पाटील (ठेका कर्मचारी) हे एकाच विभागात सलग ९ वर्षे ठाण मारून बसलेले आहेत.त्याच्या पाठी कोणाचा वरदहस्त आहे. त्यामुळेच मनमानी कारभार करत असून तेथील कर्मचारी वर्ग याच्यमुळे त्रस्त आहे. ते आपल्या पदाचा गैरवापर करून आपल्या मर्जीतील सुपालयरची बिले वेळेत पास करून देत असल्याचा आरोप होत असुन सदर कर्मचाऱ्याची नेमणूक ऑर्डर कॉपी ची प्रत मिळावी. ( नियमा प्रमाणे ठेका कर्मचाऱ्यांची पोलीस पडताळणी) जितेंद्र पाटील यांच्या नॉन क्रिमिनल दाखला इ. पुरतता याची पाहणी करून पुरव्यांनीशी चौकशी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.
कोरोना विलगीकरण कक्ष, विवा कॉलेज शिरगावसाठी २५०० बेड, खाटा पुरवण्यात आल्या होत्या व त्या गायब करण्यात आल्या आहेत अशी माहिती विश्वसनीय सूत्रांद्वारे मिळाली आहे व त्याच्यामागे सदर व्यक्तीचा हात असन्याचा दाट संशय आहे. सदर प्रकाराची तात्काळ चौकशी करुन संबधीत व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी
मागणी आयुक्त अनिल पवार यांना आज करण्यात आली.