
वसई तहसीलदार कार्यालयापासून झेंडाबाजारपर्यंत जो रस्त्यावर चिखल व माती पसरविण्यात आलेली आहे . ज्यामुळे सातत्याने दुचाकीचे अपघात होत असून पादचाऱ्यांनाही प्रचंड त्रास होत तसेच सुकलेल्या मातीमुळे प्रचंड धुळ उडत आहे हे एक प्रकारे पर्यावरणास हानी पोहोचविण्याचाच प्रकार आहे आहे. या संदर्भात समीर वर्तक यांनी प्रभाग समिती आय च्या सह आयुक्त यांना लेखी तक्रार पत्र देण्यात आले आहे. त्या तक्रार पत्रा मध्ये रस्तावर त्वरीत पाण्याने धुवून स्वच्छ करण्यात यावा आणि संबंधित व्यावसायिक ज्याने हा प्रकार केलेला आहे त्याच्यावर पर्यावरण संरक्षण कायदा , सरकारी मालमलेचे नुकसान व नागरीकांना विनाकारण त्रास दिल्यासंदर्भात गुन्हा दाखल करून रस्ता स्वच्छ करण्यासाठी जो खर्च झालेला आहे तो या गुन्हेगाराकडून वसूल करण्यात यावा. तसेच या चिखलामुळे अपघातग्रस्तांना झालेल्या दुखापती वरील संपूर्ण खर्च भरण्यासंदर्भात योग्य ती कारवाई करावी अशी मागणी केली आहे.
