



प्रभाग ड मधील फायर ब्रिग्रेडच्या समोरच्या बिल्डिंग समोर एका दुकानदाराने कोणतीही परवानगी न घेता अनधिकृत शेड बांधलं आहे. व ते शेड सर्व बाजूने बंद केलं आहे. त्यामुळे लोकांना तसेच आजूबाजूच्या दुकानदारांना त्रास होत आहे.
संबंधित विषय शेड बांधताना तोंडी महानगर पालिकेच्या अधिकाऱ्यांना सांगितलं होता. व दुसऱ्या दिवशी (०५- जुलै-२०१९) रीतसर अर्ज देऊन व त्याची प्रत तुळींज पोलीस स्टेशन ला रवाना सुद्धा केली होती.
ज्या दुकानदाराने अर्ज केला त्यांनी ६ जुलै व ८ जुलै ला जाऊन पुन्हा कारवाही का केली नाही म्हणून विचारणा केली तर उडवा उडवीची उत्तर देण्यात आली.
आज पुन्हा ते दुकानदार महानगर पालिकेचे अधिकारी राठोड याना भेटले. तर पुन्हा त्यांनी तेच उत्तर दिल व उद्या पाहू आता आमच्याकडे कामगार नाहीत असा उत्तर दिल.
त्या प्रकाराबद्दल मी राठोड याना फोने केला असता मी २ दिवस झाले इथे आलो आहे. माज्यावर सुद्धा काही अधिकारी आहेत. माज्याकडे अर्ज आला नाही अशी उत्तर दिली.
नक्की एका दुकानासमोरील तेही रास्ता लागत असलेलं विनापरवानगी शेड महानगर पालिकेचे अधिकारी अर्ज करून व त्याचा पाठपुरावा करून सुद्धा का करत नाहीत.
सामान्य माणसाच्या अर्जावर हे अधिकारी कारवाही का करत नाहीत. नक्की याना माज कसला आला आहे.
प्रभाग ड चे सहायक आयुक्त दीपक म्हात्रे काय करतात.