
प्रतिनिधी : भूखंड बिनशेती करण्याकरिता वसई तहसील कार्यालयातील तहसीलदार, नायब तहसीलदार यांनी चौपाट ” दर” वाढविला आहे. त्यामुळे भूखंड बिनशेती करणे महाग झाले आहे. तसेच भूखंड बिनशेती करण्याकरिता आता ५२-५४ चा पिक पाहणी उतारा, तलाठी पंचनामा ही अतिरिक्त कागदपत्रे मागितली जात आहेत.
याबाबतची अधिक माहिती अशी की, वसई तहसील कार्यालयातील नायब तहसीलदारांनी भूखंड बिनशेती करण्याकरिता लाचेचा दर वाढविला आहे. त्यांनी प्रती चौरस फूट २ रुपये दर ठेवला आहे. नायब तहसीलदारांनी आपला दर वाढविल्यामुळे तहसीलदार यांनी ही आपला दर वाढविला आहे. लाचेचा दर चक्क चौपट झाला असल्याचे वृत्त आहे.
तसेच भूखंड बिनशेती करण्याकरिता आता ५२-५४ चा पिक पाहणी उतारा, तलाठी पंचनामा ही अतिरिक्त कागदपत्रे मागितली जात आहेत. भूखंड बिनशेती करण्याकरिता सदरची कागदपत्रे आवश्यक असल्याबाबत शासनाचे परिपत्रक आहे का ? जी काही कागदपत्रे लागतील ती शासनाच्या परिपत्रकाप्रमाणेच !