वसई विरार शहर महानगर पालिका हद्दीतील प्रभाग समिती-ब प्रभाग क्रमांक-११ येथील नाल्यावर असलेल्या फुटपाथवर झाकण नसल्याने दिनांक-२५/ ०६/ २०२२ रोजी रात्री-१० ते १०.३० च्या दरम्यान श्री. मारुती शिंदे नावाचे इसम चालत घरी जात असताना नाल्यात पडले, व त्यांच्या पायाला दुखापत झाली,परंतु नाला एवढा मोठा आहे की जर पाऊसाच्या पाण्याचा प्रवाह असता तर सदर इसम नाल्यातून वाहून गेला असता .व त्याचा पत्ता सुद्धा लागला नसता, हे प्रत्यक्ष ठिकाणी पाहणी केली की अंदाज येतो.
ह्या नाल्यावरील झाकणे ३ महिने अगोदर बसवण्यात आली होती,परंतु ती लोखंडी असल्याने काही चोरांनी चोरीली ही बाब निदर्शनास आल्यावर पक्षाचे स्थानिक पदाधिकारी श्री. मिलन शिंदे यांनी वारंवार निवेदन देऊन व सचिव -विशाल चेंदवणकर यांनीही तात्काळ झाकणे बसवली जावीत म्हणून निवेदन दिली होती पण गेंड्याची कातडी पांघरून बसलेल्या अधिकाऱ्यांनी कधीच लक्ष दिले नाही, आणि त्याचा परिणाम म्हणून एका सामान्य घरातील इसमाला आपला जीव गमवावा लागला असता, पण त्याचे नशीब बलवत्त म्हणून जीव वाचला,पण पायाला मोठी इजा झाली आहे .तेथील स्थानिक नागरिकांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले पण पायाला मोठी दुखापत झाल्याने शस्त्रक्रिये शिवाय पर्याय नाही असे रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले व त्या शस्त्र क्रियेचा खर्च ७० ते ८० हजार रुपये इतका होईल, कोरोनाच्या काळातील आर्थिक टंचाईचे चटके सोसत असतानाच घरातील कमावणाऱ्यावरच ही वेळ आल्याने संपूर्ण कुटूंब चिंतेत आहे
ह्यासर्व बाबीची चर्चा आणि निवेदन भाजपाचे विरार शहर मंडळ देऊन सदर इसमावर ओढवलेला प्रसंग हा पालिकेच्या हलगर्जी कारभारामुळे झाल्याने श्री. मारुती शिंदे यांच्या रुग्णालयाच्या खर्चाची जबाबदारी व पुढील जेवढे दिवस ते घरी असतील त्याची नुकसानभरपाईची जबाबदारी पालिकेने घेऊन बेजबादार उप / सहाय्यक अभियंता यांच्या पगारातून तात्काळ करावी. तसेच उद्धट बोलणाऱ्या शाखा अभियंता-जितेश पाटील यांना तात्काळ निलंबित करून ठेकेदार यांच्यावर कठोर कारवाई करून त्याचे नाव काळ्या यादीत समाविष्ठ करावे,ही मागणी करण्यात आली त्यावेळी विरार शहर मंडळ अध्यक्ष-नारायण मांजरेकर सरचिटणीस-महेश पटेल उपाध्यक्ष-महेश अंबाजी कदम, नारायण घाडी, सचिव-अरविंद गावडे,विशाल चेंदवणकर वॉर्ड अध्यक्ष-मिलन शिंदे,समाज सेवक-संदेश पाटील आणि मारुती शिंदे* यांचे भाऊ उपस्थित होते.
चर्चे दरम्यान पालिकेतून मदत देऊ असे आश्वाशन ड्रा, किशोर गवस-उपायुक्त(बांधकाम विभाग) यांनी भारतीय जनता पार्टीच्या शिष्टयमं डळाला दिले असल्याचे महेश कदम यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *