
ठाणे व पालघर जिल्हा प्रा. शि. सह. पतसंस्था मर्यादित संस्थेची संचालक मंडळासाठी पंचवार्षीक निवडणूक 19 जून 2022 रोजी पार पडली.या निवडणूकीमध्ये वसई तालुक्यातून विजय रॉड्रिग्ज हे प्रचंड मताधिक्याने विजयी होऊन त्यांची संचालक पदी निवड झाली आहे याबाबत त्यांचे तालुक्यातील सर्व शिक्षक शिक्षिकांनी अभिनंदन केले आहे.
ठाणे व पालघर प्रा.शि.सहकारी पतसंस्था ही जिल्ह्यातील जिल्हा परिषद, पंचायतसमिती ,तसेच महानगरपालिका क्षेत्रातील सर्व शिक्षकांच्या आर्थिक अडीअडचणी सोडवणारी पतसंस्था असून तिला 100 वर्षांची उज्ज्वल परंपरा आहे. राज्यातील अग्रगण्य पतसंस्था आहे. प्रत्येक पाच वर्षासाठी संस्थेच्या कार्यकारी मंडळाची निवडणूक घेतली जाते. 2022 ते 2027 या पाच वर्षाच्या कालावधीसाठी 19 जून 2022 रोजी निवडणूक घेण्यात आली. वसई तालुक्यातील संचालक पदासाठी श्री. विजय रॉड्रिग्ज यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला होता.त्यांना तालुक्यातील सर्व शिक्षकांनी मत देऊन प्रचंड मतांनी विजयी केले. त्यामुळे तालुक्यातील शिक्षक शिक्षिकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. आपला हक्काचा माणूस पतसंस्थेमध्ये गेल्याने सर्वांनी समाधान व्यक्त केले आहे. विजय रॉड्रिग्ज यांना निवडून येण्यासाठी म.रा.प्रा. शि. संघ उपाध्यक्षा सौ. स्मिता सोहनी मॅडम व पालघर जिल्हा महिला अध्यक्षा तथा वसई ता. प्रा. शि.संघ अध्यक्षा सौ.कॅथरीन परेरा मॅडम यांनी मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य केले.तसेच सर्व शिक्षक कार्यकर्त्यांनीदेखील विजय रॉड्रिग्ज यांना निवडून आणण्यासाठी विशेष मेहनत घेतली व सहकार्य केले , याबद्दल विजय रॉड्रिग्ज यांनी सर्व शिक्षक,शिक्षिका, सहकारी यांचे आभार मानले आहेत.