
प्रतिनिधी : वसई तहसीलदार कार्यालयातील नायब तहसीलदार प्रदीप दामोदर मुकणे व माणिकपूर मंडळ अधिकारी संजय सोनावणे यांना लाच लुचपत प्रतिबंधक खात्याच्या अधिकाऱ्यांनी अटक केली असून लाचखोर अधिकाऱ्यांच्या अटकेमुळे नागरिक अत्यंत आनंदी असल्याचे चित्र पहावयास मिळते. या बाबतची अधिक माहिती अशी की, दि. २०.६. २०२२ रोजी वसई तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार प्रदीप दामोदर मुकणे व माणिकपूर मंडळ अधिकारी संजय सोनावणे यांनी गाव मौजे गोखिवरे सर्वे नंबर २३३ हिस्सा नंबर अ /३ क्षेत्र १.२०.० हे. आर. या जमिनीचे फेरफार क्र. ४३७२ रद्द करणे कामी तक्रारदार यांचेकडून २ लाख रुपये लाचेची मागणी केली होती. त्या अनुषंगाने दि. २२.६. २०२२ रोजी करण्यात आलेल्या पडताळणीमध्ये माणिकपूर मंडळ अधिकारी संजय राजाराम सोनावणे यांनी तक्रारदार यांच्या प्रलंबित कामाची पूर्तता करून देण्यासाठी २ लाख रुपये लाचेच्या रकमेची मागणी करून तडजोडी अंती १, ९०, ०००/- रुपये मागणी करून स्विकारण्याचे मान्य केल्याचे पडताळणीत निष्पन्न झाले. त्यानंतर दि. ३०.६. २०२२ रोजी करण्यात आलेल्या पडताळणी कारवाईमध्ये नायब तहसीलदार प्रदीप दामोदर मुकणे यांनी तक्रारदार यांचे प्रलंबित कामाची पूर्तता करून देण्यासाठी २ लाख रुपये लाचेच्या रकमेची मागणी करून तडजोडी अंती १, ५०, ०००/- रुपये मागणी करून स्विकारण्याचे मान्य केल्याचे पडताळणीत निष्पन्न झाले. त्या अनुषंगाने दि. ४.७. २०२२ रोजी सापळा कारवाई नायब तहसीलदार प्रदीप दामोदर मुकणे व माणिकपूर मंडळ अधिकारी संजय राजाराम सोनावणे यांना तक्रारदार यांच्याकडून लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले आहे. लाच लुचपत प्रतिबंधक खात्याचे पोलीस अधीक्षक पंजाबराव उगले यांच्या मार्गदर्शनाखाली उप अधीक्षक नवनाथ जगताप, पोलीस निरीक्षक स्वपन बिश्वास व त्यांचे सहकारी यांनी ही कारवाई केली. लाच लुचपत प्रतिबंधक खात्याचे अधिकारी सदर प्रकरणात अधिक चौकशी करीत आहेत. नायब तहसीलदार प्रदीप दामोदर मुकणे यांच्याकडे अंदाजे कऱोडोंची करोडची मालमत्ता असल्याचा अंदाज आहे. त्यांनी भ्रष्ट मार्गाने प्रचंड संपत्ती जमा केल्याचा आरोप केला जात आहे. प्रदीप दामोदर मुकणे व संजय राजाराम सोनावणे यांच्याकडून किती मालमत्ता शोधण्यात लाच लुचपत प्रतिबंधक खात्याच्या अधिकाऱ्यांना यश मिळते ते लवकरच कळेल. प्रदीप दामोदर मुकणे हा मोठा मासा गळाला लागला आहे, लाच लुचपत प्रतिबंधक खात्याने अगदी व्यवस्थित खातिरदारी करून मस्त चोपून काढून प्रदीप दामोदर मुकणे व संजय राजाराम सोनावणे यांच्याकडून त्यांच्या कडील बेहिशोबी काळ्या संपत्तीचा शोध घ्यावा.सदर प्रकरणात वसईच्या तहसीलदार उज्वला भगत यांचा ही हात आहेच. तहसील कार्यालयाच्या प्रमुख आहेत उज्वला भगत. सदर प्रकरणात त्यांचा हात नाही, असे होऊच शकत नाही. प्रदीप मुकणे यांची लाच लुचपत प्रतिबंधक खात्याने कसून चौकशी केल्यास सत्य समोर येईल. गाव मौजे धोवली सर्वे १०४ अ येथील गरीबांच्या झोपड्या तोडण्याच्या प्रकरणात ही प्रदीप मुकणे यांचा हात आहे. सदरचा सात बारा अनिलकुमार सावंत याच्या नावे करताना तहसीलदार कार्यालयाकडून स्थळ पाहणी करण्यात आली नाही. त्या ठिकाणी असलेल्या झोपड्या तोडण्यात आल्या. प्रदीप दामोदर मुकणे यांना गोरगरिबांचे शिव्याशाप काय असतात ते कळले. देवाच्या लाठीचा आवाज नसतो. तिचा अशा प्रकारे प्रहार होत असतो. तहसीलदार उज्वला भगत यांना ही देवाच्या लाठीचा प्रहार भोगावा लागणार आहे. मंडळ अधिकारी संजय सोनावणे यांनी अनेक तक्रारींकडे कानाडोळा करून लाच खाऊन विकासकांना साथ दिली. यामध्ये तहसीलदार उज्वला भगत, प्रदीप मुकणे ही सामील आहेत. प्रदीप मुकणे यांनी अंदाजे कऱोडोंची मालमत्ता जमविल्याचा आरोप होत असून याबाबत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने कसून चौकशी करून कारवाई करावी. प्रदीप दामोदर मुकणे हे दहावी नापास असताना शासनाची दिशाभूल करून दहावी उत्तीर्ण झाल्याबाबतचा दाखला जोडून महसूल विभागात नोकरी मिळविली होती. सदर बाबत तक्रारी दाखल असून शासनाने कारवाई करावी. दहावी नापास असताना दाखल्यामध्ये खाडाखोड करून उत्तीर्ण झाल्याबाबत दाखला जोडून शासनाची दिशाभूल करणारे प्रदीप मुकणे हे नायब तहसीलदार म्हणून कार्यभार पाहत होते, ही अत्यंत लाजीरवाणी बाब आहे.