बर्गर पिज्जा वडापावपेक्षा ,पोळीभाजी आहे सर्वश्रेष्ठ ,पण लक्षात कोण घेतो ?

फॕशन व पाश्चात्त्य  वेशभुषेपेक्षा ,पारंपारिक भारतीय पेहरावच सर्वश्रेष्ठ  ,पण लक्षात कोण घेतो ?

मंदिरापेक्षा शाळेला दिलेले दानच सर्वश्रेष्ठ ,पण लक्षात कोण घेतो ?

व्हॉटस अप व फेसबुकनी जपलेल्या आभासी नात्यापेक्षा , हृदयापासुन जपलेली नाती सर्वश्रेष्ठ पण लक्षात कोण घेतो ?

मातृभाषेतील शिक्षण इंग्रजी शिक्षणापेक्षा आहे सर्वश्रेष्ठ , पण लक्षात कोण घेतो ?

पाश्चात्त्य संस्कृतीपेक्षा भारतीय संस्कृतीच सर्वश्रेष्ठ ,पण लक्षात कोण घेतो ?

सौ. कॕथरीन फेलिक्स परेरा
सहशिक्षक
जि .प. तुळींज मराठी
अध्यक्ष वसई तालुका प्राथमिक शिक्षक संघ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *